Download App

पंजाबराव डख यांचं ऐकलं अन्… : नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त; कथित हवामान तज्ञ पुन्हा तोंडघशी

परभणी : पाऊस पडेल, या दिवशी असा पाऊस, तसा पाऊस पडेल असे अंदाज व्यक्त करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे कथित हवामान तज्ञ पंजाबराव डख पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. पंजाबराव डख यांच्या परभणी जिल्ह्यातूनच एका संतप्त शेतकऱ्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तो पंजाबराव डख यांच्याबद्दल आणि त्यांनी व्यक्त केलेल्या पावसाच्या अंदाजावर हा शेतकरी तीव्र शब्दात संताप व्यक्त करताना दिसत आहे. (farmer expressed his anger on the rain forecast expressed by Punjabrao Dakh)

काय म्हणाला शेतकरी?

पंजाबराव डखच नाव नाय काढायचं… तारीख पे तारीख… हे काठीच घालीन बघ तुला बी अन् पंजाबराव डखाला बी. नुसत्या तारखा सांगतात. पाऊस पडना… सगळं चाललं आमचे वाळून. खतं टाकलं पाऊस सांगितला म्हणून. आग पडली कापसाला सगळी. बघा हे माझा गरीब माणसाचा कापूस. त्या पंजाबराव डखनी सांगितला होता पाऊस, म्हणून खत टाकलं. देवावर भरवसा नव्हता पण पंजाबराव साहेबांवर ठेवला होता. पण आता खल्लास, असं म्हणत शेतकऱ्यांने संताप व्यक्त केला.

Ahmednagar Rain : नगर शहराला पावसाचा तडाखा! अनेक ठिकाणी अतिवृष्टी; जिल्ह्यातही कोसळ’धार’

यापूर्वीही पंजाबराव डख सापडले होते वादात :

महाराष्ट्रात हवामान अंदाज व्यक्त करणारे व्यक्तिमत्व म्हणून पंजाबराव डख शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. नियमितपणे पावसाचे अंदाज व्यक्त करणारे व्हिडीओ ते व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत असतात. मात्र यावर्षी त्यांचे बऱ्यापैकी अंदाज चुकीचे निघाल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील एका शेतकऱ्यांशी त्यांचा वाद झाला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांने पंजाबराव डख यांच्यावर चुकीचा हवामान अंदाज दिल्याचा आरोप केला होता.

Nagpur : दोन तासांचा पाऊस दोन महिलांच्या जीवावर बेतला; 400 जणांची सुटका; जनावरांचीही जिवीत हानी

तर काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात ढगफुटीचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला होता. हा अंदाज ऐकून शेतकऱ्यांनी शेतमालाची काढणी करून घाईने बाजारपेठात विकला. मात्र त्यानंतर नाशिक जिल्ह्यात ढगफूटी झालीच नाही. दराच्या झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यानंतर नाशिक जिल्ह्यातील जाधव नामक एका शेतकऱ्याने पंजाबराव डख शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे व्हाईस मेसेज व्हॉटसग्रुपवर पाठवले. हे मेसेज ऐकून डख यांनी जाधव यांना कॉल केला. या संभाषणात दोघांमघ्ये जोरदार वादावादी झाली होती. या सगळ्यामुळे  डख यांचा हवामान अंदाज नेमका कशाच्या आधारे असतो? असा आक्षेप शेतकरी घेत आहेत.

Tags

follow us