Download App

शेतकरी हीच आमची जात…जातीच्या राजकारणावरुन अजित पवार सभागृहात आक्रमक

  • Written By: Last Updated:

मुंबई : अहो शेतकरी आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली विचारताय असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्‍या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते? असा सवालही अजित पवार यांनी केला.

ई पॉस मशीनवरुन अधिवेशनात गदारोळ; राज्य सरकार नमले 

ई पास सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रकाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागते आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये असेही अजित पवार यांनी खडसावून सरकारला सांगितले.

Sharad Pawar : …म्हणून निलेश लंके म्हणाले, पवारसाहेब माझा बालहट्ट पुरतात

या प्रकरणात कनिष्ठ अधिकारी बळीचे बकरे ठरु नये. कोण यामध्ये सहभागी आहे त्याच्यावर कारवाई करावी आणि जातीचे लेबल बंद करावे व याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

Tags

follow us