Download App

Mumbai News : अंधेरी पूर्व भागात सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग; काही कामगार अडकल्याची भीती

थील सर्व गोदामला मोठ्या संख्येमध्ये काम करणारे कामगार आहेत. काही कामगार बाहेर निघाल्याची माहिती मिळत आहे. तर, काही

  • Written By: Last Updated:

Fire Mumbai In Andheri East : मुंबईतील अंधेरी पूर्वमध्ये एमआयडीसी परिसरात भंगारवाडीमध्ये चार ते पाच लाकडाच्या दुकानात मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज संध्याकाळी लागल्याची माहिती आहे. (Andheri) लाकूड गोदाममध्ये सिलेंडर ब्लास्ट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गाळे आहेत आणि या गाळात केमिकल आणि लाकूडचा गोदाम असल्यामुळे 8 ते 10 गाळ्यात आग वाढली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. या घटनेत आठ ते दहा सिलेंडर ब्लास्ट झाल्याची माहिती आहे.

मोठी बातमी! शायना एन.सी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं; ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांवर गुन्हा दाखल

येथील सर्व गोदामला मोठ्या संख्येमध्ये काम करणारे कामगार आहेत. काही कामगार बाहेर निघाल्याची माहिती मिळत आहे. तर, काही कामगार आत अडकल्याचा भीती देखील व्यक्त केली जात आहे. आजूबाजूला जेवढे घर आहेत, जवळपास सर्व घरांमध्ये आग पसरत आहे. परिसरातील पंधरा ते वीस घर आणि गोदाम जळून खाक झाली आहेत. ही आगीने मोठा भडका घेतल्याची माहिती आहे. परंतु, अग्निशमन दलाचे मोठे प्रयत्न सुरू आहेत.

घरात आणि गोदाममध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर असल्यामुळे ही आग वाढली. झोपडपट्टी मधून लोकांना बाहेर काढण्याचे काम एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सिलेंडर ब्लास्ट होत असल्यामुळे अग्निशमन दलातील जवानांना आग विझवण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल होऊन झोपडपट्टी खाली करत आहेत. आग विझवायचा प्रयत्न देखील अग्निशमन दलाचे जवानांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

 

 

follow us