समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक अन् कारच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा एकदा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

News Photo   2026 06 28T150131.424

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक अन् कारच्या धडकेत कारमधील 5 जणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात (Accident) अपघाताची भीषण घटना घडली असून या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. समृद्धी महामार्ग चॅनल नंबर 104 च्या नजीक ट्रक आणि वॅगनार कारचा भीषण अपघात झाला.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा एकदा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. थेट नागपूर ते मुंबई सर्वात मोठी कनेक्टिव्हीटी म्हणून देशभरात नावारुपाला आला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात अपघातात महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं.

मुख्य माहिती आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ; अण्णा हजारे आंदोलनावर ठाम

आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग चॅनल नंबर 104 च्या नजीक ट्रक आणि वॅगनार कारचा भीषण अपघात झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारमधील मृत झालेले सर्व प्रवासी चंद्रपूर येथील रहिवासी असून मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय, तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

Exit mobile version