मोठी बातमी! माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन

Shivraj Patil Chakurkar : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी पहाटेच्या

Shivraj Patil Chakurkar

Shivraj Patil Chakurkar

Shivraj Patil Chakurkar : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी लातूरमधील राहत्या घरी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत लोकसभा अध्यक्षपदासह देशातील अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आहे. शुक्रवारी लातूरमधील (Latur) देवघर या निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होता

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्व गमावले : उपमुख्यमंत्री अजित पवार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक सभ्य,सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

कोण होते शिवराज पाटील चाकूरकर ?

12 ऑक्टोबर 1935 रोजी शिवराज पाटील (Congress) यांचा जन्म लातूरमधील चाकूर गावात झाला. ते लातूरसह मराठवाड्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला होता. तर 2004 मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने राज्यसभेवर घेत गृहमंत्रिपदसह अनेक केंद्रीय जबाबदाऱ्या दिल्या. त्यांनी 2004 ते 2008 दरम्यान केंद्रात गृहमंत्रिपद भूषवले.

12 December 2025 Horoscope : नशीब चमकणार अन् ‘या’ लोकांना होणार आर्थिक फायदा; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार ?

तर 1980 च्या दशकात ते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. तर 1991 ते 1996 दरम्यान ते लोकसभेचे 10 वे अध्यक्ष होते. 2010 ते 2015 दरम्यान ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक होते.

Ashutosh Kale : विरोधकांना पराभव दिसत असल्याने पातळी सोडून टीका; आमदार आशुतोष काळे स्पष्टच म्हणाले

Exit mobile version