‘सबसे कातिल गौतमी पाटील’ गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की, तरुणांचा धूडगुस, हुल्लडबाजी, गोंधळ होणार हे काही संपूर्ण महाराष्ट्राला नवीन नाही. अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली गौतमी पाटीलने आपल्या नृत्याच्या जोरावर महाराष्ट्रात लाखो चाहता वर्ग निर्माण केलाय.
सत्तार भावनिक माणूस, सत्तारांच्या वक्तव्यावर विखेंचं स्पष्टीकरण
वाढदिवस, जत्रा किंवा लग्नसमारंभ अशा कार्यक्रमांना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवायचा, अशी एक प्रथाच अलीकडच्या काळात सुरु झालीय. काही दिवसांपूर्वीच एका बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एवढी क्रेझ असतानाच आता आणखी एक किस्सा समोर आलायं.
Jiya Khan suicide case प्रकरणाची आज सुनावणी, सूरज पांचोलीचे काय होणार?
पुण्यातल्या मुळशीमध्ये विवाह समारंभानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मात्र, त्या कार्यक्रमाला कोणाचीही गर्दी नव्हती. तर गर्दीऐवजी एका बैलाला स्टेजसमोर बांधण्यात आलं होतं. ‘बावऱ्या’ असं या बैलाचं नाव असून या कार्यक्रमात गौतमी पाटीलही चक्क बैलासमोर मुरडत थिरकरल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या गौतमीच्या थिरकरण्याचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच जोर धरत आहे.
नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत कॉंग्रेसला पडायचंच नाही
मुळशीतल्या सुशील हगवणे युवा मंचच्या बावऱ्या फॅन्स क्लबच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. स्टेजसमोरच बैल बांधण्यात आल्याने समोर तरुणांची गर्दी नाही, आणि आपण नृत्य करायचं हा प्रकार गौतमीसाठी पहिल्यांदाच घडला. तरीही गौतमीने न डगमगता आपली नृत्याची कला नेहमीप्रमाणेच सादर केली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गौतमी पाटील दिलखुलासपणे नृत्य केल्याची चर्चा रंगली.
दरम्यान, जुन्या काळात विवाह समारंभात मांडव टिळ्याच्या कार्यक्रम करण्यात येत होता. त्यावेळी लग्नाच्या दारात मांडव आणि मांडवाातून बैलगाडीमधून नवरदेवाची मिरवणूक काढली जात असे, हीच प्रथा कायम ठेवण्यासाठीच आपण दारातच गौतमीचा कार्यक्रम ठेऊन बैलगाड्याचं प्रतिक म्हणून घरातला बैल कार्यक्रमासमोर उभा केला, असल्याचं आयोजक राजेंद्र हगवणे यांनी सांगितलं.