gokul-election-result-live : कोल्हापूर सहकारी दूध संघ म्हणजे गोकुळच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. महायुतीने बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. परंतु गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे मात्र मोठ्या मतांनी पिछाडीवर आहे. हा महायुतीसाठी मोठा धक्का आहे. तर तिसऱ्या फेरीत सतेज पाटील गटाने मोठी मुसंडी घेतलीय.महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी असून ,त्यांचे चिन्ह कपबशी आहे. या आघाडीचे नेतृत्व मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक हे करत आहेत. तर महाविकास आघाडीची राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी आहे. या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे बंटी पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज, राजू शेट्टी हे करत आहेत. समविचारी आघाडीचे चिन्ह शिट्टी आहे.
Gokul election result live : गोकुळमध्ये बाजी पलटली; बंटी पाटलांची समविचारी आघाडी 14 जागांवर आघाडीवर
महायुतीने बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. परंतु गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे मात्र मोठ्या मतांनी पिछाडीवर आहे.

WhatsApp Image 2026 10 19 At 1.35.28 PM