देवी जागृत आहे… अंगावर उठेल… गोकुळच्या प्रचारात धार्मिक भावनांचा वापर केल्याचा आरोप

Gokul’s election campaign निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून सभासदांनादेवीच्या प्रकोपाची भीती घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Gokul Election Campaign

Gokul Election Campaign

Gokul’s election campaign Religious sentiments in by Allegations of devi to Members : सध्या राज्यामध्ये एकीकडे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कोल्हापूरमध्ये गोकुळ दुधसंघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात आता एक नावा वाद समोर आला आहे. कारण या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून सभासदांना थेट देवीच्या प्रकोपाची भीती घातल्याचा आणि धार्मिक भावनांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

गोकुळ दूध संघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, सभासदांकडून दगाफटका होऊ नये, यासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना नियम धाब्यावर बसवून महायुतीच्या नेत्यांनी कर्नाटकातील सौंदत्ती येथे जाऊन सभासदांना शपथ दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मंत्री हसन मुश्रीफ सभासदांना यल्लमा देवीच्या प्रकोपाची भीती दाखवत असल्याचे दिसत आहे.

‘कागलची अब्रू वाचवणं आता तुमच्या हातात’

व्हायरल व्हिडिओमध्ये मंत्री हसन मुश्रीफ सभासदांना उद्देशून बोलताना दिसतात. ते म्हणतात, “सर्व 25 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आणि त्याबाबत शपथ घेण्यासाठी आपण सौंदत्तीच्या डोंगरावर आलो आहोत. माझ्यासह सर्वांनी शपथ घ्यायची आहे. मी गद्दारी करणार नाही, अशी शपथ घ्यायची आहे. यासाठी दोन ते अडीच तास लागतील. कागलची अब्रू वाचवणं आता तुमच्या हातात आहे. आमची तुम्हाला शपथ आहे. यल्लमा देवी किती जागृत आहे, हे तुम्हाला माहिती आहे. जो खोटं करेल, त्याच्यावर देवीचा प्रकोप होतो.” मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

धनंजय महाडिक यांचाही शपथ देतानाचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचाही सभासदांना शपथ देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. ही सामान्य निवडणूक नसल्याचे सांगत त्यांनी महायुतीच्या सर्व २५ उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. व्हायरल व्हिडिओमध्ये धनंजय महाडिक म्हणताना दिसतात, “आमची आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची कॉलर खाली होता कामा नये. ती ताठ राहिली पाहिजे. तुमच्यासोबत आम्हीही शपथ घेणार आहोत. शपथ घेताना एवढंच म्हणायचं आहे की, महायुतीच्या सर्व २५ उमेदवारांना मतदान करायचं आहे. कपबशीला मतदान करणार आहे. आई यल्लमा, आम्ही शपथ घेतो.” गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सभासदांना सहलीवर पाठवणे आणि सौंदत्ती येथे देवीची शपथ दिल्याचे व्हिडिओ समोर आल्याने निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या व्हिडिओंमुळे निवडणूक आचारसंहितेच्या पालनाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

Exit mobile version