Maharashtra IAS Transfer List : राज्य सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेत राज्यात आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Maharashtra IAS Transfer) केल्या आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी नितीन पाटील (Nitin Patil) यांची राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ए.बी. धुळाज (A.B.Dhulaj) यांची बदली सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे. ए.बी. धुळाज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ येथे कार्यरत होते मात्र आता त्यांची बदली ओबीसी बहुजन कल्याण विभाग येथे करण्यात आली आहे.
तर आयएएस अधिकारी लहू माळी व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाबासाहेब बेलदार यांची महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
बाबासाहेब बेलदार अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग येथे जबाबदारी पार पाडत होते. याच बरोबर मुरुगनंथम एम यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुरुगनंथम एम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया येथे जबाबदारी पार पाडत होते.
आयएएस अधिकारी आदित्य जीवने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयएएस अधिकारी मिन्नू पी.एम. सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि आयएएस अधिकारी मानसी सहाय्यक जिल्हाधिकारी देसाईगंज उपविभाग गडचिरोली यांची महापालिका आयुक्त लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra IAS Transfer List
नितीन पाटील (IAS:SCS:2007) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ए.बी. धुळज (IAS:SCS:2009) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
लहू माळी (IAS:SCS:2009) व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई यांना आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:2015) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग यांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मुरुगनंथम एम. (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आदित्य जीवने (IAS:RR:2021) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मन्नू पी.एम. (IAS:RR:2021) सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
South Africa Playing XI WTC Final: दक्षिण आफ्रिका तयार, WTC Final साठी प्लेइंग-11 जाहीर
मानसी (IAS:RR:2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची महापालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.