Cm Devendra Fadanvis : विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊलं उचलण्यात येत आहेत. सरकारकडून आता माध्यमांवर नजर ठेवण्यासाठी एक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून भरघोस निधीचीही तरतूद करण्यात आलीयं. या केंद्रासाठी सरकारने 10 कोटी रुपयांची तरदूत केलीयं. वृत्तपत्र, टिव्ही, सोशल मीडियावर बातम्या प्रसारित होत असतात. या बातम्यांसंदर्भातील अहवाल हे केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये फेक न्यूज आढळून आल्यास सरकारकडून कारवाई करण्यात येणार आहे. सरकारकडून याबाबत जीआर प्रसिद्ध करण्यात आलायं.
गरिबाला अमानुष मारहाण, नोटांची उधळपट्टी अन् धसांबरोबर फोटो; बीडचा सतीश भोसले नेमका कोण?
या बातम्यांवर देखरेख ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार असून फेक न्यूज आणि ज्या बातम्यांमुळे राज्यात असंतोष निर्माण होईल अशा बातम्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओळखता येतील. या बातम्यांचे विश्लेषण करण्यासाठी एका खासगी संस्थेची मदत घेतली जाणार आहे. ही खासगी कंपनी महत्वाच्या बातम्यांचे पीडीएफ तयार करणार आहेत. त्यानंतर संबिधित विभाग या बातम्या सकारात्मक किंवा नकारात्मक आहे का याचा तपास करतील. टीव्ही आणि सोशल मिडीयावरच्या बातम्यांवर नजर ठेवून त्यासंबंधित विभागांना अहवाल सादर केला जाणार आहे.
केंद्र तयार करण्याचा उद्देश काय?
फडणवीस सरकारने स्थापन केलेले मीडिया ट्रॅकिंग सेंटर माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या अंतर्गत तयार करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्दिष्ट विविध वृत्त माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालांचे पुनरावलोकन आणि विश्लेषण करणे आहे. यानंतर, याबद्दलची माहिती सरकारला दिली जाईल. सरकारची भूमिका आणि योजनांव्यतिरिक्त, हा विभाग राजकीय बातम्या, सरकारविरोधी बातम्या आणि विरोधी पक्षांच्या आरोपांशी संबंधित बातम्यांवर लक्ष ठेवणार आहे. सोशल मीडिया, वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरही लक्ष ठेवले जाईल.
देशासाठी पुन्हा खेळणार सुनील छेत्री, वयाच्या 40 व्या वर्षी करणार कमबॅक, ‘हे’ आहे कारण
केंद्र सखोल अहवाल सरकारला देणार…
दररोज प्रमुख वर्तमानपत्रांचे डिजिटल कटिंग्ज प्रदान करण्यासाठी टीव्ही, डिजिटल आणि सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे निरीक्षण करणे आणि दर तासाला त्यांचा ट्रेंड, सूर आणि ट्रेंड रिपोर्ट करणे, असं या केंद्राचं काम असणार आहे. सरकारशी संबंधित सकारात्मक आणि नकारात्मक कव्हरेजचा अभ्यास करून सखोल अहवाल तयार करणे याबाबतचा अहवाल केंद्राकडून देण्यात येणार आहे. सरकारी योजना आणि धोरणांना जनतेचा आणि माध्यमांचा प्रतिसाद मूल्यांकन करणार आहे.
दिशाभूल थांबवण्यावरही काम करणार कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करणार आहे. विरोधी पक्षांवर लक्ष ठेवण्यासोबतच, महाराष्ट्र सरकार दिशाभूल करणाऱ्या बातम्या थांबवण्याचे काम देखील करेल. खोट्या, दिशाभूल करणाऱ्या किंवा भडकवणाऱ्या बातम्या ओळखण्यासाठी आणि त्यांचा प्रभाव थांबवण्यासाठी सेंटरमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. बनावट बातम्या आणि चुकीच्या माहितीवर लक्ष ठेवण्यासाठी एआय-आधारित प्रणाली विकसित केली जाणार आहे. माध्यमांमधील सरकारविरोधी किंवा पक्षपाती बातम्यांचे विश्लेषण केले जाईल आणि योग्य प्रतिसाद दिला जाईल. प्रशासनाशी संबंधित महत्त्वाची माहिती गोळा करून सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे.