Download App

Deepali Sayed यांच्या भ्रष्टाचाराला राज्यपालांचे पाठबळ, माजी पीएचे खळबळजनक आरोप

अहमदनगर : अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या सहकार्याने मोठा गैरव्यवहार (Corruption) केला आहे, असा आरोप दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या ट्रस्टने सांगली येथे ४० जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा व राज्यभवनात कोविड योद्धा पुरस्कार सोहळा घेतला होता. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठा गैरव्यवहार झाला आहे. यात दिपाली सय्यद यांना भगतसिंह कोश्यारी यांचे पाठबळ आहे.

सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्यांच्या साथीदारांशी संबंध आहेत. त्यामुळे त्यांना विभानसभेचे तिकीट मिळाले होते. दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई व्हावी व भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून दूर करावे, या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंत येथे २८ फेब्रुवारीपासून आंदोलन करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

अंडरवर्ल्डमधील काही गुन्हेगारांशी सय्यद यांचा दूरध्वनी वरून व प्रत्यक्ष संपर्क होत असायचा. असे असतानाही राज्यपाल कोश्यारी यांनी सय्यद यांना राज्यभवनात प्रवेश दिला. तसेच सय्यद यांच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काही राजकीय नेत्यांना व्हिडिओद्वारे आवाहन करण्यास कोश्यारी यांनी सांगितले असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.

Tags

follow us