Download App

काटेवाडीत अजित पवारच ‘दादा’; शिंदे गटाकडून वळसे-पाटलांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरुंग

पुणे : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या 2 हजार 300 ग्रामपंचायतींमधील मतदानाची मतमोजणी होऊन निकालाची आकडेवारी समोर येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. तर, राष्ट्रवादी (अजित पवार) गट दुसऱ्या क्रमांकावर, शिवसेना (शिंदे गट) तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस चौथ्या क्रमांकावर, ठाकरे गट पाचव्या आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गट सहाव्या क्रमांकावर गेला आहे. या निकलात अनेक दिग्गजांनाही त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. यात अगदी शरद पवार यांच्यापासून ते काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत अनेक आमदार-खासदार आणि बड्या नावाचा सर्वांचा समावेश आहे.

काटेवाडीत अजित पवारांचे वर्चस्व :

पवार कुटुंबियांचे मूळगाव असलेल्या काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे आज सर्व राज्याचे लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीतील बंडानंतर इथे शरद पवार यांची सत्ता येणार की अजित पवार यांना कौल देणार याबाबत चर्चा सुरु होत्या. याआधी काटेवाडी गावात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीवर एकत्रित राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र, आता अजित पवार गटाने 13 जागांवर मुसंडी मारत ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीवर बाळासाहेब थोरात गटाची सत्ता

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाने सत्ता काबीज केली आहे. नरेंद्र उर्फ अमोल गुंजाळ हे सरपंचपदी विजयी झाले आहेत. तर विखेपाटील गटाचा पराभव झाला आहे.

राम शिंदेंचा रोहित पवारानां दे धक्का! कर्जतमध्ये एकहाती विजय तर जामखेडमध्ये…

कर्जतमध्ये सहा तर जामखेडमध्ये तीन अशा नऊ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या. यामध्ये कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कर्जतमध्ये भाजपला सहा जागांवर विजय मिळाला असून कर्जतमध्ये भाजपच्या राम शिंदे यांचे वर्चस्व दिसून आल्याचे दिसते आहे.

जामखेडमध्ये तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन जागांवर विजय मिळाला तर भाजपला एका जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान कर्जत जामखेड यांच्या नऊ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे.

आगामी निवडणूक पाहता रोहित पवारसांठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. तर राम शिंदे यांनी आगामी निवडणुकांपूर्वी आपले राजकीय वजन पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

जामखेड – 3
राष्ट्रवादी शरद पवार गट – 2
भाजप -01

कर्जत -06
राष्ट्रवादी (आमदार रोहित पवार गट) – 0

अरणगाव ग्रामपंचायतीवर निलेश लंकेचे पॅनल विजयी

आमदार लंके यांच्या गटाचे पुंड विजयी नगर तालुक्यातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अरणगाव ग्रामपंचायतीत आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी झाला आहे. सरपंच पदी पोपट पुंड विजयी झाले आहे.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांची निरगुडसर गावातील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात!

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची निरगुडसर गावातील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात ! शिवसेनेचे रविंद्रशेठ वळसे पाटील विक्रमी मतांनी विजय.

आटपाडी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकहाती सत्ता

तालुक्यातील करगणी, नेलकरंजी, मानेवाडी, वाक्षेवाडी, कानकात्रेवाडी, चिंचाळे, आंबेवाडी, मिटकी, काळेवाडी या 9 ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता, तर विभुतवाडी, मासाळवाडी, निंबवडे, पिंपरी खु. शिवसेनेकडे आणि अमरसिंह देशमुख गटाकडे एक ग्रामपंचायत गेली आहे.

खानापूर तालुक्यातील 5 पैकी 5 ग्रामपंचायतीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकहाती सत्ता

राजधानी भेंडवडे व साळशिंगे ग्रामपंचायतीवर आमदार गोपीचंद पडळकर यांची सत्ता.

बारामती अपडेट

बारामती तालुक्यातील एकूण 31 पैकी 26 ग्रामपंचायती राष्ट्रवादी (अजित पवार गट) पुरस्कृत पॅनलकडे तर 2 ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच

1)भोंडवेवाडी
2)म्हसोबा नगर
3)पवई माळ
4)आंबी बुद्रुक
5)पानसरे वाडी
6)गाडीखेल
7)जराडवाडी
8)करंजे
9)कुतवळवाडी
10)दंडवाडी
11)मगरवाडी
12)निंबोडी
13)साबळेवाडी
14)उंडवडी कप
15)काळखैरेवाडी
16)चौधरवाडी
17)वंजारवाडी
18)करंजे पूल
19)धुमाळवाडी
20)कऱ्हावागज
21)सायबाचीवाडी
22)कोराळे खुर्द
23) चांदगुडेवाडी – सरपंच भाजप
24) शिर्सुफळ
25) मेडद
26) पारवडी – सरपंच भाजप
27) मुढाळे
28) सुपा

जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव :

नारायणगाव ग्रामपंचयातीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली. 17 पैकी 16 उमेदवार विजयी, सरपंचपदही ठाकरे गटाकडे गेले आहे.

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अपडेट

एकूण ग्रामपंचायत – 48

निकाल जाहीर – 36

भाजप – 04
शिंदे गट – 05
अजित पवार गट – 09
उद्धव ठाकरे गट – 04
काँग्रेस – 04
शरद पवार गट – 04
मनसे – 02
इतर – 04

कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत निकाल :

निवडणूक जाहीर झालेल्या एकूण ग्रामपंचायती : 89

तांत्रिक कारणामुळे रद्द झालेल्या ग्रामपंचायत : 04

प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती : 74

प्रत्यक्ष पोट निवडणुकीसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायती : 11
…………..

भाजप – 6
शिंदे गट – 6
उध्दव ठाकरे गट – 3
अजित पवार गट –23
शरद पवार गट – 00
काँग्रेस – 12
जनसुराज्य : 07
इतर – 28
…………….
एकूण : 85

Tags

follow us