Haribhau Bagade : सर आयझॅक न्यूटनने (Isaac Newton) सफरचंद पडताना पाहिलं आणि त्यातून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा (Gravitational force) शोध लागला, ही कथा सर्वपरिचित आहे. १६८७ मध्ये सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला. पण, त्यांच्याही शेकडो वर्ष आधी वेदांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा बलाचा उल्लेख करण्यात आलाय, असा दावा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी (Haribhau Bagade) केला.
‘मारहाणीचा व्हिडिओ’ सतीश भोसलेला ओळखतो, पण मीच बॉस….सुरेश धस धक्कादायक बोलले
बुधवारी जयपूर येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बागडे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय ज्ञान परंपरेचा हवाला देतांना अलिकडच्या काळात लागलेले अनेक शोध हे फार पूर्वी भारतात लागले होते, असा दावा केला. ते म्हणाले, भारत हा पूर्वीपासून ज्ञान आणि विज्ञानमध्ये समृद्ध आहे. भारताने जगाला दशांश पद्धत दिली. न्यूटनने जगाला गुरुत्वाकर्षणाच्या नियमाबाबत फार उशीरा सांगिलतं. भारतामध्ये तर फार पूर्वीच वेदांमध्ये त्याबाबत उल्लेख करण्यात आलाय, असं बागडे म्हणाले.
अमेरिकेची धाकधूक वाढली! चीनने अरबो डॉलर्सने वाढवले डिफेन्स बजेट, भारतसमोर मोठे आव्हान
वीज अन् विमानाचा शोध भारताचा…
दरम्यान, अनेक शोधाची जननी भारत आहे. वीज, विमान या गोष्टींचा उल्लेख भारतात फार पूर्वी झाल्याचंही बागडे म्हणाले. वीज, विमान यासारख्या अनेक शोधांचा उल्लेख भारतीय इतिहास ग्रंथांमध्य आढळून येतो. ऋग्वेदातही याचे संदर्भ आढळतात. महर्षी भारद्वाज यांनी लिहिलेल्या पुस्तकात विमानांचा उल्लेख आहे. ५० वर्षांपूर्वी नासानेही हे पुस्तक मिळावं अशी मागणी करणारं पत्र लिहिलं होतं, असं बागडे म्हणाले.
बागडे म्हणाले की, तुम्ही नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांबद्दल ऐकले असेलच. ही दोन्ही विद्यापीठे इतकी समृद्ध होती की जगभरातून विद्यार्थी या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतं. त्याकाळी या विद्यापीठांमध्ये फक्त संस्कृत भाषा होती, इतर कोणतीही भाषा वापरली जात नव्हती. बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठ उद्धवस्त केलं. पण, आता नालंदा विद्यापीठी नव्याने उभं केलं जात आहेत. ते पुन्हा पूर्वीसारखेच कार्यरत होईल, असंही बागडे म्हणाले.
भारतात आल्यानंतर, ब्रिटिशांनी भारतीय ज्ञानाला दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच भारतीय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात सातत्याने भर घालत राहणं महत्वाचं ठरतं, असंही बागडे म्हणाले.