Download App

हसन मुश्रीफांना दिलासा तर किरीट सोमय्यांना दणका; मुश्रीफ प्रकरणात चौकशीचे आदेश

Hasan Mushrif vs Kirit Somaiya : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. येत्या 24 एप्रिलपर्यंत मुश्रीफांवर कोणतीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. कोल्हापुरात दाखल असलेली एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी न्यायालयात दाद मागितली होती. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना जेरीस आणणाऱ्या भाजपच्या किरिट सोमैय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्या यांना दणका दिला आहे. सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुश्रीफांच्या प्रकरणांशी काहीच संबंध नसतानाही त्यांना कोर्ट आदेश व एफआयआरची प्रत कशी उपलब्ध होते, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे.

वाचा : ED Raid : ईडीविरोधात हसन मुश्रीफांनी दंड थोपटले

दरम्यान, साखर कारखान्यातील गैरव्यवहारावरून आज ईडीने पुन्हा मुश्रीफ यांच्या मालमत्ता असलेल्या दोन ठिकाणी छापेमारी केली. कोल्हापूर आणि पुणे येथे ही कारवाई सुरू आहे. ईडीने याआधीही मुश्रीफांच्या मालमत्तांवर छापेमारी केली होती.

मुश्रीफ यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी इडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलांविरोधात चाळीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. हा दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी सुरू आहे.

Tags

follow us