Download App

HMVP Virus : होम क्वारंटाईन, आयसोलेशन वॉर्डबाबत आरोग्यमंत्री आबिटकरांचं मोठं विधान

Health Minister Prakash Abitkar Reaction On HMPV Virus : राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी एचएमपीव्ही व्हायरसबाबत आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे. नागपुरात सापडलेल्या दोन संशयित रुग्णांवर (एचएमपीव्ही विषाणू) प्रतिक्रिया देताना म्हणाले, या संशयित रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे, हे दोन्ही रुग्ण सामान्य (HMPV Virus) आहे. तसेच हा विषाणू नवीन नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. HMPV विषाणू संदर्भात आज (SOPs) आज जारी केल्या जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

साखर महागणार? 11 रुपयांनी भाव वाढण्याची शक्यता, केंद्र सरकारचे संकेत

नागपुरमध्ये एचएमपीव्हीचे दोन रूग्ण आढळलेत. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Health Minister Prakash Abitkar) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. नागपुरमध्ये दोन लहान मुलांचा एचएमपीव्हीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाय. सात वर्षीय मुलीला अन् 13 वर्षीय मुलाला एचएमपीव्हीची लागण झाल्याचं समोर आलीय. यासंदर्भात बोलताना आरोग्यमंत्री प्रकार आबिटकर म्हणाले की, यासंदर्भात आम्ही बैठक बोलावलेली आहे.

हा एचएमपीव्ही विषाणू पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. फक्त चीनमध्ये त्याची संख्या वाढल्यामुळं, चीन काळजी घेत आहे. आपल्याकडे यासंदर्भात केंद्र शासनाच्या देखील सूचना आलेल्या आहेत. सुरूवातीला अलर्ट मोडवर काम करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला आपण सूचना दिल्या आहेत. पुढील काळात नागरिकांसाठी काही सुचना जारी केल्या जाणार आहेत. आरोग्य विभागाची टीम नागरिकांना योग्य त्या सूचना देणार आहेत.

ब्रेकिंग! नेपाळमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, 9 जणांचा मृत्यू

या आजाराबद्दल घाबरण्याचं कारण नाही. गांभीर्याने काळजी घ्यावी. बऱ्याचवेळा थोडीशी घबराट आपल्या सगळ्यांना त्रासदायक ठरते. हा आजार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. परंतु यांचं गांभीर्य तितकंस नाहीये. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे. पूर्वी श्वसनाचे आजार असतील, अशा लोकांना देखील काळजी घेणं गरजेचं आहे. या संदर्भात सूचना आणि एसओपी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं जारी केल्या जातील. केंद्र शासनाने यासंदर्भात सुचना जारी केल्या आहेत. आपण देखील त्याच पद्धतीने काम करत आहोत, असं आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर (Health Minister) म्हणाले आहेत.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं आहे की, या नव्या विषाणूला घाबरण्याचं कारण नाही. त्यामुळं केवळ आरोग्यविभागाच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. होम क्वारंटाईन, आयसोलेशन वॉर्ड उभारण्याची इतक्यात गरज नसल्याचं देखील आबिटकर म्हणाले आहेत.

 

follow us