Download App

अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला, शेतीचं प्रचंड नुकसान

Maharashtra Rain: राज्यात काल रात्री विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (unseasonal rain) धुमाकुळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (farmers) प्रचंड नुकसान झाले आहे. कांदा, आंबा, द्राक्षे, टरबूज, संत्रा कलिंगड, गहू, हरभरा, काजू अशा सर्वच हाताशी आलेली पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्यात शुक्रवारपासून बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, अमरावती, बुलढाणा, सांगली, परभणी, यवतमाळ या जिह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. मागील महिन्यात देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. त्यावेळी देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. पंचनामे लवकर न झाल्याने अजूनही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित आहे.

चिंता वाढली! कोविडनंतर देशात आढळला नवा व्हायरस…

कोकणात फळबागांचे नुकसान
तळकोकणात सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे आंबा, काजू, कोकम, जांभूळ पिकांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस पडल्याने फळांमध्ये जंतू तयार होण्याची भीती आहे. तसेच ढगाळ वातावरण असल्याने देखील आंबा बागायतदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

अमरावती, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यातील गहू, हरभरा, मिरची, कांदा आणि पालेभाज्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, या भागात एका महिन्यात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अहमदनगर, सांगली परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्षे, कांदा, गहू, ज्वारी, कापूस, पालेभाज्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Tags

follow us