मुंबई, पुणे, अहिल्यानगरसह ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस; पुढील 4 दिवसांसाठी अलर्ट जारी; जाणून घ्या अंदाज

Maharashtra Rain Alert : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत मुसळधार

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाची सुरुवात झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना तसेच पेरणीसाठी तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे आता मान्सूनबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांना येलो आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई वेधशाळा हवामान अंदाजनुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर (Palghar) , ठाणे, मुंबई, पुणे (Pune) , रायगड, रत्नागिरी, नाशिक, संभाजीनगर, जळगाव, जालना, परभणी, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 25 जूनसाठी पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आले आहे.

24 जूनसाठी येलो अलर्ट

सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.

25 जूनसाठी येलो अलर्ट

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.

26 जूनसाठी येलो अलर्ट

मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अहिल्यानगर, बीड, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.

27 जूनसाठी येलो अलर्ट

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग.

ग्रामीण भागातील सायंकाळच्या लोडशेडिंगविरोधात विधानसभेत आमदार खताळ आक्रमक

28 जूनसाठी येलो अलर्ट

मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.

Exit mobile version