Maharashtra Weather : पुणे, सातारासह ‘या’ जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज

Maharashtra Weather : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस होताना दिसत आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Maharashtra Weather : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस होताना दिसत आहे. पुढील काही दिवसात राज्यात पावसाचा जोर देखील कमी होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. मात्र त्यापूर्वी हवामान विभागाने पुणे, सातारा आणि रायगडच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे या भागात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे रत्नागिरी, ठाणे, नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात देखील आज पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर मुंबईतही आज पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील इतर काही भागात आता पावसाचा जोर पुढील काही दिवसांसाठी कमी होणार असल्याची देखील माहिती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

6 August Horoscope : ‘या’ 5 राशींसाठी आज होणार लाभ; जाणून घ्या कसा राहणार दिवस ?

Exit mobile version