Maharashtra Rain Alert : पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत असल्याने पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रासह गुजरात राज्याला अति मुसळधार

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत असल्याने पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रासह गुजरात राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्राकडून वेगानं वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने पुढील काही दिवसात राज्यात जोरधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात दोन ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत मात्र अरबी समुद्रातून (Arabian Sea) किनारपट्टीकडे येणाऱ्या वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने पाऊस नाही तर कोकण आणि किनारपट्टीलगत भागात वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे मुंबई (Mumbai Rain Alert) , ठाणे, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड येथे 50 ते 70 किमी ताशी वेगानं वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कन्या राशीसह सहा राशींसाठी धनलाभ; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार?

पुण्यात रेड अलर्ट

तर दुसरीकडे हवामान विभागाने पुणेसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची आज शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मराठवाडा वगळता संपूर्ण राज्यात आज पावसाची शक्यता आहे.

Exit mobile version