Hoardings dangerous due to Unseasonal Rain Citizens in danger administration’s negligence : गेल्या वर्षी 12 मे रोजी मुंबईमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठी दुर्घटना घडली होती. मुंबईतील घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत 17 जणांचा जीव गेला होता तर 70 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. अशीच स्थिती सध्या अहिल्यानगर शहरात निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची माघार…
गेल्या आठवड्यापासून अहिल्यानगर शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच 20 मे रोजी वादळी वाऱ्याच्या पाऊस झाला. या पावसाने पोलीस अधीक्षक कार्यालय चौकातील होर्डिंगचा लावलेला फ्लेक्स फाटला. हा फ्लेक्स मुख्य वीज वाहक तारांवर अडकला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे महावितरण, महापालिकेसह पोलीस प्रशासनाचे देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी केला.
Video : ‘…असं फक्त पवारांचा पठ्ठ्याचं करू शकतो’; पुणे जलमय होताच रस्त्यावर केलं अनोखं आंदोलन
दरम्यान राज्यामध्ये लावल्या जाणाऱ्या होर्डिंग्जबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गेल्याचं महिन्यात थेट आदेश दिला आहे. त्यामध्ये ते म्हटले आहेत. की, ‘अनधिकृत फ्लेक्सवर टाच आणण्याची गरज आहे. ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावण्याची खुमखुमी आहे त्यांनी जे अधिकृत होर्डिंग आहेत त्याच्यावर आपली जाहीरातबाजी केली पाहिजे’, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फ्लेक्स लावून जाहीरातबाजी करणाऱ्या मंडळींना सुनावलं. जर माझ्या स्वतःचे जरी अनधिकृत फ्लेक्स कार्यकर्त्यांनी लावले असतील तर तेही काढून टाका हेही सांगायला फडणवीस विसरले नाहीत.