Download App

मी नवाब मलिकांना देशद्रोही म्हटलं, ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले की, बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं असं विधान शिंदे यांनी केलं. यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे मांडला होता. यावर आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान शिंदे यांच्या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध करण्यात आला. शिंदे यांच्या वक्तव्याने सभागृहात मोठा गदारोळ देखील झाला. त्यामुळे आज विधानपरिषदेत सभापतींच्या परवानगीने मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या विधानाबद्दल खुद्द शिंदे यांनी स्वतः खुलासा केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी त्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना देशद्रोही म्हणालो नव्हतो हे माझं वक्तव्य अजित पवार, अंबादास दानवे यांच्याबद्दल नव्हतो.

मी जे बोललो ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल होते. मलिक यांच्यावर एनआयए, ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशद्रोही दाऊद इब्राहिम, छोटा शकील, इकबाल मिर्ची, हसीना पारकर यांच्यांशी संबंध व आर्थिक व्यवहार केल्याचा मलिक यांच्यावर आरोप आहे. त्यानूसार मलिकांवर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे, असे शिंदे यावेळी बोलताना म्हणाले आहे.

मायक्रो प्लॅनिंगनं प्रचार केला तसच पराभवाचं आत्मपरीक्षण करा, टिळकांचा भाजपला सल्ला

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, देशद्रोही दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याने मलिक यांना जेलमध्ये जावे लागले, पुरावे असताना त्यांचा राजीनामा का घेण्यात आला नाही? असा सवाल यावेळी शिंदे यांनी उपस्थित केला. देशद्रोह्यांना पाठीशी घालण्याचे काम झाले. विरोधकांकडे मात्र याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला.

IND vs AUS 3rd Test: फिरकीच्या जाळ्यात फलंदाज अडकले, भारत पराभवाच्या उंबरठ्यावर

दाऊदने मुंबईमध्ये अनेक वेळा बॉम्बस्फोट घडवले. देशद्रोही दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मालकांचा राजीनामा का घेतला नाही. अशा लोकांना तुम्ही पाठीशी घातले म्हणून अशा लोकांसोबत चहापान टाळलं असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

Tags

follow us