ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड धमकी प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. शाहरुख सय्यद नामक व्यक्तीने महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी फोन करुन आव्हाड यांना ठोकणार असल्याची धमकी दिल्याचा दावा केला आहे. शाहरुख सय्यद यांच्या दाव्यानंतर ठाण्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी मला फोन करुन जितेंद्र आव्हाड यांना ठोकणार असल्याची धमकी दिल्याचा दावा ठाण्यातील शाहरुख सय्यद यांनी केला. शाहरुख सय्यद म्हणाले, रविवारच्या दिवशी सायंकाळी पावणे दहाच्या सुमारास मला सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा कॉल आल्याचं सय्यद यांनी सांगितलंय. फोनवर आहेर म्हणाले, मी जितेंद्र आव्हाड यांनी ठोकणार आहे, असं आहेर मला म्हंटल्याचा दावा सय्यद यांनी केला आहे.
‘या गद्दारांना न्यायालय धडा शिकवेल…; अंबादास दानवेंचा शिंदे गटावर जोरदार हल्लबोल
यासोबतच आहेर अनेक बाबींवर माझ्याशी बोलत असल्याचंही सय्यद यांनी सांगितलंय. यासंदर्भात मी कोणाशीही बोलण्यास तयार असून ठाण्याच्या आयुक्तांनी माझी नार्को टेस्ट करावी, यासंदर्भात अनेक खुलासे होणार असल्याचा दावाही सय्यद यांनी केला आहे.
Chandrashekhar Bavankule : गिरीश बापट आजारी… तरी त्यांना प्रचाराला उतरू का?
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्याला संपविण्यासाठी कट कारस्थाने रचले जात असल्याचा दावा केला होता. याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांसमोरही सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिल्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
या क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना ठोकण्याबाबत महेश आहेर आणि एका अज्ञात व्यक्तीमध्ये बोलणं झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, क्लिप व्हायरल होताच आव्हाड समर्थकांकडून महेश आहेर यांना मारहाण करण्यात आली आहे.
महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर ठाण्यातील मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे ऑडिओ क्लिपमध्ये असलेला आवाज माझा नसून मला आणि माझ्या कुटुंबाला जितेंद्र आव्हाडांपासून धोका असल्याचं महेश आहेर यांनी म्हंटलंय.