छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Crime) येथे खोट्या जन्मतारखा, जन्मस्थळ, शपथपत्र, जन्माचे खोटे पुरावे देऊन विलंबाचे जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा प्रकार उघड झाला आहे. या माध्यमातून शासनाची फसवणूक केल्याने सिटी चौक पोलीस ठाण्यात २९ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२५ दरम्यान घडली.
या प्रकरणी उपविभागीय अधिकारी डाॅ. व्यंकट कठीराम राठोड यांनी तक्रार दिली. त्यानुसार, २९ अर्जदारांनी जन्म प्रमाणपत्रासाठी सादर केलेले पुरावे, कागदपत्रे व शपथपत्रे तपासणीअंती चुकीची असल्याचे समोर आले आहे. या सर्वांनी सरकारी नोंदीत खोटे दाखले देऊन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. साक्षीदारांनी दिलेली माहिती, व्यवहार प्रत्यक्ष नोंदींशी जुळत नव्हते. राहण्याचे पत्ते, दिलेले तपशील आणि पालकांची माहिती यातही विसंगती दिसल्याने प्रशासनाने कारवाई केली.
त्याचबरोबर लातूर येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांनी दिलेली जन्म नोंदणीची एक हजार ९४६ प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. आता संबंधितांना ‘एसओपी’नुसार नोंदणी करावी लागणार आहे. आतापर्यंत एक हजार ४०० च्यावर प्रमाणपत्रे परत घेण्यात आहेत. उर्वरित प्रमाणपत्रे परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
गुन्हा ज्यांच्यावर नोंद केला आहे त्यांची नाव खालीलप्रमाणे
संजय रामचंद्र गवळी, हबीब अहमद शेख, नैना शांतीलाल हनवते, धरमसिंग श्रावणसिंग ब्रह्मणावत, संजय उत्तम लकडे, तुळशीराम दादासाहेब कोरडे, रियाज नानू सय्यद, शेख अस्लम शेख गणी, शेख रफिक शेख मेहबुब, रिजवाना शेख गफुर, श्रीधर पुंजराम टारपे, संतोष सांडू दाभाडे, स्वप्नील दशरथ दोंदे, अब्दुल जब्बार हाजी मोहम्मद गौस, अबुजर रज्जाक पठाण, राजू आबाजी जोंधळे, रेहाना बेगम शेख इद्रीस, आजिमुद्दीन काझी अब्दुल बारी, मानसी सुधाकर शिंदे, शेख चांद शेख मकबुल, शेख माजेद शेख इसाक, मोहम्मद आरिफ सत्तार, सुभाष सखाराम लोखंडे, फरजाना सय्यद रशीद, आशुलाल रब्बानी कुरैशी, अफसर नवाब शेख, विनाेद सुभाष तायडे, ज्योती अशोक भिसे, सुकराबी शेख सत्तार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
