BJP State Executive Meeting : भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यकारणीची बैठक आज (दि. 18) पुण्यात बालगंधर्व सभागृहात (Balgandharva Hall)सुरु आहे. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष (State president of BJP)चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)यांनी विविध घोषणा केल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government)मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये सरकार पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) नेमणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकार आपल्या कार्यकर्त्यांना खूश करण्याच्या प्रयत्न केला आहे.
महाविकास आघाडीत फुट? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून विविध योजनांचा भडीमार सरकारकडून केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता आपल्या कार्यकर्त्यांना खूश करण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जाणार आहे.
पुण्यातील बालगंधर्व सभागृहात आज भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यात येणार आहेत.
या पदांवर भाजपचे एक लाख 25 हजार कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या 50 हजार कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे बूथ लेव्हलचे अध्यक्ष आणि मंडलाध्यक्षांना विशेष कार्यकारी अधिकारी केले जाणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले .
शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनाही यामध्ये संधी मिळणार आहे. या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकार आगामी निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहे. आपल्या कार्यकर्त्यांना खूश करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. आपल्या कार्यकर्त्यांना विविध पदांवर संधी देऊन एकप्रकारे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याची फुंकर मारली जाणार आहे. कार्यकर्त्यांना या पदांवर संधी देण्यासाठी तातडीची योजना जाहीर करण्यात आली आहे.
या निवडी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या पातळीवरच होणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज असणार नाही. त्यामुळे पंधरा दिवसात या नेमणुका पार पडणार आहेत. त्या माध्यमातून राज्यातील पावणेदोन लाख भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना थेट विशेष कार्यकारी अधिकारी करण्यात येणार आहे.
राज्यातील महापालिका निवडणुका घेण्यास भाजप-शिवेसेना आजही तयार असल्याचे सांगून महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेबाबत घेतलेला चुकीचा निर्णय आम्ही रद्द केला, त्याच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस न्यायालयात गेली आहे. त्यामुळेच निवडणुकांना उशीर होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.