Download App

Ulhas Bapat : देशात पंतप्रधान केंद्रीत..,राज्यपालांच्या पदमुक्तीवर कायदेतज्ज्ञ थेट बोलले

मुंबई : वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पदमुक्त होण्याबाबत इच्छा व्यक्त केल्याने त्यांच्या या मागणीवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat)यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनूसार पदमुक्त केलं जाऊ शकतं, असं कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी म्हंटलयं. राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांनी नुकतंच पदमुक्त होण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.

बापट म्हणाले, राज्यपालांचा राजीनामा स्वीकारायचा की नाही, हे राष्ट्रपती ठरवणार आहेत. राजकीय परिस्थिती पाहुन सर्व काही निर्णय घ्यावे लागतात. राज्यपालाची नियुक्ती ही 55 कलम 55 नुसार राष्ट्रपतींकडून नियुक्ती केली जाते. राष्ट्रपतीच राज्यपालांना पदमुक्त करु शकतात, असंही त्यांनी यावेळी म्हंटलय.

तसेच आपल्या देशात पंतप्रधान केंद्रीत व्यवस्था झाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं असून कलम 74 नुसार पंतप्रधानांच्या सांगण्यावरुनच राष्ट्रपती काम करत असतात. राज्यपाल कोश्यारी यांनी राजीनामा राष्ट्रपतींकडे दिला पाहिजे. राज्यपाल कोश्यारींनी आपल्याला पदमुक्त होण्याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे कळवल्याने पंतप्रधान मोदींच्या सुचेनवरुन ते राज्यपालांना पदमुक्त करु शकतात असंही ते म्हणाले आहेत.

राज्यपालांनी नेमकं काय म्हंटल?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत माहिती दिली की, पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीदरम्यान, मी त्यांना सर्व राजकीय जबाबदाऱ्या सोडण्याची आणि माझे उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर कार्यात घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांत राज्यपाल कोश्यारी यांच्यावर महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप ठेऊन राज्यभरात निदर्शने, आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळी अनेकांनी राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. आता येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानंतर त्यांना पदमुक्त केलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

Tags

follow us