उत्पन्न वाढवा अन्यथा नोकरी गमवा; परिवहन मंत्री सरनाईकांचा एसटीच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

Sarnaika's ultimatum to ST officials परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी कठोर भूमिका घेत थेट अधिकाऱ्यांना जबाबदार धरत कडक इशारा दिला आहे.

Pratap Sarnaik

Pratap Sarnaik

Increase income or lose job Transport Minister Sarnaika’s ultimatum to ST officials : राज्याच्या दळणवळणाचा कणा मानल्या जाणाऱ्या एमएसआरटीसी म्हणजेच एसटीच्या उत्पन्नवाढीबाबत आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी आता थेट अधिकाऱ्यांना जबाबदार धरत कडक इशारा दिला आहे.

अली खामेनींच्या अंत्यसंस्कारला भारत उपस्थित राहणार; PM मोदी नाही, ‘या’ राज्याचे राज्यपाल अन् एक मंत्री जाणार

एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी मंत्री सरनाईक यांनी जे कर्मचारी आपल्या कामात हलगर्जीपणा करत आहेत. ज्यामुळे विभागाला तोटा सहन करावा लागत आहे. अशा अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे जर पुढील एका महिन्यात एसटी बसेसच्या उत्पन्नात वाढ झाली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागेल. असा एक महिन्याचा अल्टीमेटम देत सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

माजी मंत्री रावसाहेब दानवेंचा बंगला चोरट्यांनी फोडला पण…

तसेच जर पुढील 30 दिवसात सकारात्मक परिणाम न दिसल्यास राज्य परिवहन मंडळाच्या महसुलात भरीव वाढ दिसून न आल्यास संबंधित अधिकाऱ्यांचे केवळ बदलीच केली जाणार नाही. तर त्यांच्यावर पदावनती किंवा थेट निलंबन यासारखी मोठी कारवाई केली जाऊ शकते.

कनिष्ठ अभियंता परीक्षार्थींचे महापालिकेसमोर आंदोलन; चौकशीचे आश्वासन, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच राहणार

हा निर्णय घेण्यात आला आहे, कारण एप्रिल आणि मे या प्रवाशांच्या गर्दीच्या काळात देखील भाडेवाढ करूनही महसूल लक्षणीयरीत्या घटला आहे. या अपयशामुळे व्यवस्थापन नियोजन आणि अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी केवळ एसी कार्यालयांमध्ये बसून कागदावर योजना आखून लांबलचक बैठका घेण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला लागण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version