Jawan Murli Naik Martyred Fighting With Pakistan In Kashmir : भारताने पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. त्यानंतर प्रत्युत्तरात पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केलाय. भारतीय सैन्य दलाने (India Pakistan War) देखील या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलंय. सीमारेषेवर तणावाचं वातावरण असून चकमक अजूनही सुरुच आहे. पाकिस्तानसोबत लढताना भारतीय सैन्य (Indian Army) दलाचे 2 जवान शहीद झाले आहेत.
आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना, शत्रूशी निर्भीडपणे लढताना मुंबईचे रहिवासी वीर जवान एम. मुरली नाईक यांना वीरमरण आलं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या बलिदानाला, शौर्याला सलाम करतो. तसंच त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.… pic.twitter.com/PfUmy17q9T
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 9, 2025
यामध्ये मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे 23 वर्षीय जवान मुरली नाईक यांना वीरमरण (Jawan Murli Naik Martyred) आलंय. ते घाटकोपर पूर्व येथील रहिवाशी होते. ते 2022 मध्ये भारतीय सेनेमध्ये नोकरीस लागले होते. त्यांची ट्रेनिंग नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथे झाली होती. ते पहिल्यांदा आसाम येथे पोस्टिंगला होते, त्यानंतर ते पंजाब येथे तैनातीस असताना त्यांना युद्धा दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्य देण्यात आले होते, त्या दरम्यान ते शहीद झाले आहेत.
त्यांचे वडील श्रीराम नाईक आणि त्यांची आई ज्योती नाईक हे पंतनगर पोलीस ठाण्यातील चित्रा डेअरी जवळ, कामराज नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई या ठिकाणी रहिवासी आहेत. त्याचे वडील श्रीराम नाईक हे मजुरीचा व्यवसाय करतात. सध्या ते त्यांच्या मूळ गावी कल्की तांडा, गोरंटाला मंडळा, जिल्हा सत्यसाई नगर, राज्य आंध्र प्रदेश या ठिकाणी यात्रा असल्याने 2 मे रोजी गावाला गेलेले आहेत.
फक्त एस 400 नाही, ‘या’ 5 डिफेन्स सिस्टीम्सने पाकिस्तानला फोडला घाम; ड्रोन अन् मिसाइल हल्ले फेल
शहीद जवान मुरली श्रीराम नाईक यांचे प्रेत अंत्य विधिकारिता त्यांच्या मूळ गावी उद्या दिनांक 10 मे रोजी सायंकाळी जाणार आहे, असे पंजाब येथील थलसेना कार्यालयातून त्यांना कळविण्यात आले. शहीद जवान यांचे वडील श्रीराम नाईक यांच्या संपर्कात असून सदरची सर्व माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली आहे. शहीद जवान मुरली नाईक यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना केली जात आहे.