Download App

कुठलीतरी यंत्रणा आहे जी त्याला वाचवतीये; फरार कोरटकरबाबत इंद्रजीत सांवत यांचा थेट आरोप

मी कोल्हापूरमध्ये राहतो, माझा आणि त्या कोरटकरचा आयुष्यात कधीच संबंध आलेला नव्हता. मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा

  • Written By: Last Updated:

Indrajit Sawant on Prashant Koratkar : इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोनवरुन धमकी दिल्याचा आरोप असलेला प्रशांत कोरटकर हा भारताबाहेर पसार झाल्याचा दाव करण्यात येत असून, त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. (Koratkar) याच पार्श्वभूमीवर इतिहासकार इंद्रजीत सावंत यानी प्रतिक्रिया दिली आहे. कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. कुठलीतरी यंत्रणा आहे जी कोरटकरसारख्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी शंका माझ्या मनात आहे, म्हणूनच त्याला आत्तापर्यंत अटक होत नाहीये असा आरोपही सावंत सावंत यांनी केला आहे.

शिवरायांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या कोरटकरला कुणाचं अभय?, दुबईला झाला फरार? फोटो आले समोर

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला मदत करणाऱ्या प्रवृत्ती असतील, तर त्या शोधून काढल्या पाहिजेत आणि त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे. त्यांचा जो बुरखा आहे तो सगळा फाडला पाहिजे, असं माझं मत आहे. हे शासनानेच करायला पाहिजे. हे गृहमंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं काम आहे, असे इंद्रजित सावंत म्हणाले. कोरटकरचा पासपोर्ट जप्त करा अशी मागणी सावंत यांनी माध्यमांशी बोलताना केली.

नंबर कुठून मिळाला?

मी कोल्हापूरमध्ये राहतो, माझा आणि त्या कोरटकरचा आयुष्यात कधीच संबंध आलेला नव्हता. मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाईल नंबर त्याला कोणी दिला ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या गोष्टीचासुद्धा तपास केला पाहिजे. माझा नंबर कुठून मिळाला, त्याच्या मोबाईलमध्ये जे कम्युनिकेशन झालं ते आत्तापर्यंत तपासायला पाहिजे होतं, महिनाभर उलटून गेला तरी यातलं काहीच होत नाहीये, त्यामुळे आधी मला जी आशा होती, ती आता कमी होत चालली आहे अशी नाराजीही सावंत यांनी व्यक्त केली.

पोलिसांशी माझं थेट बोलणं झालं नाही, माझे वकील पोलिसांना भेटून आले आहेत. कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे, असे त्यांनी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस हेच गृहमंत्रीदेखील आहेत, त्यामुळे हे सगळं प्रकरण अगदी चिल्लर आहे असं समजू नये. तो विषय अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे, कारण हा मुद्दा फक्त इंद्रजित सावंतला धमकी मिळाली याची दखल एक संवेदनशील मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून घ्यावी अशी अपेक्षाा आहे, असंही सावंत म्हणाले.

letsupp चे अनुसरण करा

`

`

follow us