Download App

जळगाव हादरले : कर्जामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने कुटुंबासह केले विषप्राषण!

Jalgao Farmer Sucide : कर्जामुळे वैतागलेल्या जळगाव जिल्ह्यातील वडली येथील एका शेतकऱ्याने आपल्या कुंटूंबियांसोबत विषप्राषण केले. या आत्महत्येच्या प्रयत्नात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पत्नी व मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुख्यत: अत्यल्प जमीन तसेच अतीवृष्टीमुळे उत्पन्नात घट झाली, बेरोजगारीने त्रस्त झालेला मुलगा आणि कुंटूंबाचा गाडा हाकण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड  करता न आल्याने वडली येथील एका शेतकऱ्याने विषप्राशन केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आला.

शेतकरी नारायण दंगल पाटील (वय ६६) हे पत्नी भारती नारायण पाटील (वय ६०) व मुलगा गणेश नारायण पाटील (वय २४) यांच्या समवेत वडली येथे राहत आहेत. गावात पाटील यांची पाटील यांची अगदी थोडीच शेती आणि पारोळा तालुक्यातील बावटे येथे काही जमीन आहे. या दोन्ही जमिनीतील उत्पन्नातून नारायण दंगल पाटील हे आपल्या कुंटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. परंतु, गेल्या काही दिवसात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली.

Pop Frances यांचं ‘सेक्स’बाबत मोठं विधान : म्हणाले ‘देवाने मानवाला दिलेल्या… – Letsupp

नारायण पाटील यांच्या मुलगा गणेश पाटील याने गावात वास्तव्याला असलेला आपला चुलतभाऊ शामकांत पाटील याला फोन करून सगळा प्रकार सांगितला आणि घरी येण्याची विनंती केली. शामकांत पाटील यांनी तातडीने आपले इतर दोन भाऊ संतोष व रमेश पाटील यांना घेवून नारायण पाटील यांच्या घरी आले असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. तिघांनी विषप्राषण केल्याचे लक्षात आल्याने शामकांत पाटील यांनी तातडीने तिघांना खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान नारायण पाटील यांचा मृत्यू झाला. तर मुलगा गणेश व पत्नी भारती यांची  प्रकृती गंभीर आहे.

मोठा मुलगा गणेश हा बेरोजगार आहे. तर छोटा मुलगा मयुर हा नाशिक येथील खासगी रुग्णालयात कामाला आहे. दोन्ही मुलं अविवाहीत आहेत. अशा परिस्थितीत कुंटूंबाचा गाडा हाकलण्यासाठी नारायण पाटील यांनी कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड करता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून ते तणावातअसल्याच पाटील यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले.

Tags

follow us