Download App

घरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू…, सर्व नातेवाईक जमलेले अन् ‘मृत’ बाबा घरी परतले

Jalgaon News : जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या या घटनेची चर्चा संपूर्ण राज्यात सुरु आहे.

  • Written By: Last Updated:

Jalgaon News : जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या या घटनेची चर्चा संपूर्ण राज्यात सुरु आहे. जळगावातील (Jalgaon) पाळधी गावात राहणाऱ्या 65 वर्षीय रघुनाथ वामन (Raghunath Vaman) चार दिवसांपासून बेपत्ता झाले होते. आज त्यांचा मृतदेह आढळल्याचे मानून त्यांच्या नातेवाइकांनी ओळख पटवली, शवविच्छेदन करून घेतले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. पण सायंकाळी सर्वांचे डोळे विस्फारले गेले, जेव्हा ‘मृत’ समजलेले खैरनार स्वतः चालत आपल्या घरी परतले.

पाळधी गावाजवळ रेल्वे रुळावर एक छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. चेहरा ओळखता न येण्यासारखा होता, परंतु चेहऱ्याचा खालचा भाग आणि अंगावरचे काही चिन्हे पाहून नातेवाइकांनी तो मृतदेह रघुनाथ खैरनार यांचाच असल्याचे मानले. पोलीस व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी नेत असताना नातेवाइकांना कळले की “बाबा घरी परतले आहेत. ” हे ऐकून क्षणभर कोणालाच काही समजेनासं झालं. गावातील साईबाबा मंदिराकडून चालत येणारे ‘बाबा’ दिसताच सारेजण सुन्न झाले.

एकीकडे शोकमय वातावरणात आसवे ओघळत होती आणि दुसरीकडे, जिवंतपणी ‘परतलेले’ बाबा पाहून कुटुंबीयांच्या आनंदाश्रूंना वाट फुटली. या अनपेक्षित घटनेमुळे पाळधी गावात एकच खळबळ उडाली असून, ओळख पटवताना अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, प्रत्यक्षात रेल्वेखाली मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही.

या संपूर्ण प्रकरणात रघुनाथ खैरनार यांचा मृतदेह समजून ओळख पटविण्या मागचे कारणही तेवढेच धक्कादायक आहे. रेल्वे स्थानकावर आढळलेला छिन्नविच्छिन्न मृतदेहाची देहयष्टी, चेहरा अगदी रघुनाथ खैरनार यांच्याप्रमाणेच होती. अंगात घातलेले कपडे पायातील चप्पल अगदी अंगावर गोंदलेले देखील सारखच असल्यामुळे रघुनाथ खैरनार यांच्या कुटुंबीयांचा गैरसमज झाला.

धक्कादायक, कॉमेडी किंग कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर अंधाधुंद गोळीबार, व्हिडिओ व्हायरल

रघुनाथ खैरनार यांची मानसिकस्थिती ठीक नसल्यामुळे ते अनेकदा अशाच पद्धतीने घरातून निघून जातात हे देखील त्यांना मृत समजण्याचे एक प्रमुख कारण ठरले. परंतु रघुनाथ खैरनार हे घरी परत आल्यानंतर सर्वांच्या आनंद गगनात मावेनासा झाला.

follow us