Download App

ED notice : चौकशीसाठी वेळ वाढवून देण्यात द्यावा, जयंत पाटलांची ईडीकडे मागणी

Jayant Patil ED notice : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे.

न्यायालयाचा हा निर्णय येत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली होती. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली आहे. या नोटीसमध्ये जयंत पाटलांना ईडीची ही नोटीस आय एल अॅंड एफ एस या प्रकरणावर आली आहे. दरम्यान त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले आहेत.

ईडीच्या नोटीसीनंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यामुळे मला चिंता…

त्यामुळे एकीकडे आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल येणार होता. तर त्याच्या काही तास अगोदर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस येणे हा योगयोग असेल का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रकरणी आज त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र चौकशीसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी जयंत पाटील यांनी ईडीकडे केली आहे. त्यांच्या घरी असलेल्या काही वैयक्तिक कार्यक्रमांमुळे त्यांनी ही वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

गोगावलेंचा whip रद्द ; जयंत पाटील यावरच खूश

दरम्यान ईडीची नोटीस मिळाल्यानंतर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, मी ज्या पद्धतीने राज्यात वावरतो बोलतो याची पूर्ण जाणीव जनतेला आहे. जनतेला कोणत्या प्रकारचे लोक काय करू शकतात याची कल्पना आहे. त्यामुळे मला चिंता वाटत नाही.

आयएल अॅंड एएसकडून एका कंपनीने कर्ज घेतलं होत. या कंपनीचं कनेक्शन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी असल्याचं बोललं जात आहे. याच कारणामुळे त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. या कंपनीने 2019 मध्ये दिवाळखोरी जाहीर केली होती. तर लोकांच्या पैशांचं मनि लॉन्ड्रींग केल्याचा आरोप आहे. तर याच प्रकरणात राज ठाकरे यांची देखील चौकशी झाली होती.

Tags

follow us