महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली आहे.
ईडीची नोटीस मिळाल्यानंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी ज्या पद्धतीने राज्यात वावरतो बोलतो याची पूर्ण जाणीव जनतेला आहे. जनतेला कोणत्या प्रकारचे लोक काय करू शकतात याची कल्पना आहे. त्यामुळे मला चिंता वाटत नाही.
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
पाटील म्हणाले की, मला नोटीस पाठवण्याची वेगवेगळी कारणं आहेत. यावर सविस्तर बोलू. मला नोटीस आल्याने मी यावर आता बोलण उचित ठरणार नाही. ज्या एजन्सीने मला नोटीस पाठवली आहे त्यांना सगळी माहिती देणे हे माझं काम आहे. पाठवण्यात आलेली नोटीस अद्याप माझ्या हातात आलेली नसून, मुंबईच्या घरी पाठवण्यात आली आहे. माणूस कर्ज काढलं की घोटाळ्यात येतो. माझं IL&FS या संस्थेशी कोणतंही ट्रॅझॅक्शन झालेले नाही. त्यामुळे माझा त्यांच्याशी काही संबंध नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यानंतरही एजन्सीला काही शंका असतील त्यामुळे त्यांनी मला नोटीस पाठवली असेल.
Supreme Court Hearing on ShivSena : घटनापीठासमोर असलेले 9 प्रश्न; यावरच येणार निकाल?
या नोटीसमध्ये जयंत पाटलांना ईडीची ही नोटीस आय एल अॅंड एफ एस या प्रकरणावर आली आहे. दरम्यान त्यांना सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे एकीकडे आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. तर त्याच्या काही तास अगोदर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस येणे हा योगयोग असेल का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
आयएल अॅंड एएसकडून एका कंपनीने कर्ज घेतलं होत. या कंपनीचं कनेक्शन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी असल्याचं बोललं जात आहे. याच कारणामुळे त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. या कंपनीने 2019 मध्ये दिवाळखोरी जाहीर केली होती. तर लोकांच्या पैशांचं मनि लॉन्ड्रींग केल्याचा आरोप आहे. तर याच प्रकरणात राज ठाकरे यांची देखील चौकशी झाली होती.