Download App

जयंत पाटील म्हणाले, सर्व मार्गानं चिरडायचा कार्यक्रम होतोय

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार घालवण्यासाठी राज्यपालांनी किती प्रयत्न केले? हे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)स्पष्ट झालेलं आहे. आता राज्यपालांच्या (Governor) कृतीवर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी म्हटलं आहे. आजच्या महाराष्ट्रातील सरकारच्या (Shinde Fadnavis Sarkar)कामाची पद्धत तुम्हाला सर्वांना माहित आहे.

साम-दाम दंड-भेद वापरण्यासाठी ते काय करतात? ते थोड्या वेळापूर्वी जितेद्र आव्हाडांनी विधानसभेत सांगितलं आहे. आपण ते जितेद्र आव्हाडांचं ते भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की, एका आमदाराला एका शहरामध्ये सर्व ताकतीनिशी सर्व मार्गानं चिरडायचा कार्यक्रम होतोय? त्याचं जितेंद्र आव्हाडांनी उदाहरण विधानसभेत दिलं आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईमधील (Mumbai)यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre)येथे बैठक घेतली. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.

तीन वर्षाच्या अज्ञातवासातून दीपक सावंत शिंदेच्या गटात

कोणत्याही पद्धतीनं त्यांच्यावर प्रेशर आणून त्यांना पक्ष सोडायला लावायचा हा प्रयत्न महाराष्ट्रातील सर्व भागात सर्व बाजूनं सुरु असल्याचा आरोप यावेळी जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की, लोकं येतात आणि जातात पण आपण सर्वांनी ठामपणाणं ताकतीनं उभं राहिलं तर मला खात्री आहे की लोकं जर जागा झाली तर नवा चेहरा हुडकण्याचाही प्रयत्न करतात.

त्यामुळं काही चिंता करायचं काम नाही. म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ठरवलंय की, आपण महाराष्ट्रातील सर्व रिजनमध्ये जाऊन आपल्या सभा घेतल्या पाहिजेत. आणि या सभांना आपल्या सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल. महाराष्ट्राची ताकद सध्याच्या सरकारला निश्चितपणाने कळेल. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळायचं काम याचसाठी चाललंय की, आपलं काही जमणार नाही. म्हणून विषाची परीक्षा घ्यायला नको म्हणून हे सगळे प्रयत्न चालू आहेत.

मला तर असं वाटतं की, विधानसभेच्या आधी हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिकेच्याच निवडणुका घेतील. त्यामुळं हे विधानसभेच्याच निवडणुका घेतील. आणि माझी आणखी एक शंका आहे की, सर्वोच्च न्यायालयाचा वेगळा निर्णय लागला तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागून विधानसभेची निवडणुकच लढवावी लागेल. त्यामुळं आपण सगळे तीनही पक्षांनी पूर्ण तयारीनं कामाला लागलं पाहिजे.

यासाठी आपणा सर्वांच्या समोर या बैठकीचं आयोजन केलं आहे. असंच नियोजन प्रत्येक जिल्ह्यात जर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या तर आणखी चांगलं यश मिळेल असा आशावाद यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us