मोहिते-पाटलांचा स्वाभिमान भीमा नदीत टाकला, पराभवाची सवय लागलीय; जयकुमार गोरेंचा हल्लाबोल

Jaykumar Gore On Mohite Patil : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या दणदणीत यशानंतर मंत्री जयकुमार गोरे

Jaykumar Gore On Mohite Patil

Jaykumar Gore On Mohite Patil

Jaykumar Gore On Mohite Patil : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या दणदणीत यशानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते-पाटील गटावर जोरदार हल्लाबोल केला. जनतेने त्यांना एकदा नव्हे, तर पाचव्यांदा त्यांची जागा दाखवली आहे. कधी कधी काही गोष्टींची सवय लागते, तशी त्यांनाही आता पराभवाची सवय लागली आहे. त्यांच्या स्वाभिमानाला जनतेने भीमा नदीत टाकले आहे अशा शब्दांत गोरेंनी विरोधकांना लक्ष्य केले. सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ राजकीय विजयाची लढाई नव्हती, तर शेतकऱ्यांच्या अर्थवाहिनीला योग्य हातात देण्याची लढाई होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांनी भाजपला आशीर्वाद दिला आहे.

भाजपचे 18 पैकी 18 उमेदवार विजयी झाले असून, एका जागेवर अपवादात्मक परिस्थितीत उमेदवार दिला नव्हता. या निकालाने सोलापूर जिल्हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध झाले असा दावा गोरे यांनी केला. विरोधकांनी आपल्या जुन्या वर्चस्वाच्या जोरावर जनतेला गृहीत धरण्याचा प्रयत्न केला. आमच्या बाप-दादांचे इथे प्रचंड वर्चस्व आहे, आमच्याशिवाय इथे काही घडू शकत नाही अशा अविर्भावात पॅनल उभे केले. मात्र, जनतेने त्यांचे सर्व प्रयत्न उधळून लावले. ज्यांनी सहकार बुडवला, बँका अडचणीत आणल्या, त्यांनीच पुन्हा सहकाराच्या गप्पा मारणे योग्य नाही, असा टोला त्यांनी लगावला. मोहिते-पाटील यांनी जिल्हा चोरांच्या हातात दिल्याची टीका केल्याबाबत विचारले असता गोरे अधिकच आक्रमक झाले. त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. स्वतःची ओळख संपूर्ण जिल्ह्यात काय निर्माण केली आहे, हे त्यांनी पाहावे. सहकारातील बँकांमध्ये हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप असताना आणि संस्थांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह असताना पुन्हा राजकारणात येऊन साधनशुचितेच्या गप्पा मारणे उचित नाही असा पलटवार त्यांनी केला.

जिल्हा बँकेला लागलेला डाग पुसून काढणार

सोलापूर जिल्हा बँकेला लागलेला डाग या विजयाच्या निमित्ताने पुसून काढू. शेतकऱ्यांची बँक अधिक मजबूत, सक्षम आणि टिकाऊ बनविण्याचे काम करू. ही निवडणूक जयकुमार गोरे किंवा पाटील यांची नव्हती, तर शेतकऱ्यांची होती. शेतकऱ्यांची अर्थवाहिनी टिकली पाहिजे आणि तिची आर्थिक ताकद वाढली पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. या निवडणुकीत शेतकरी जिंकला आहे. त्यामुळे कोण पाटील आणि कोण गोरे, हा विषय आता उरलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूर जिल्हा बँकेत भाजपची एकहाती सत्ता; 18 जागांवर मारली बाजी-

पाटलांचा कार्यक्रम फार पूर्वीच झाला

विरोधकांच्या राजकीय अस्तित्वावरही गोरेंनी निशाणा साधला. खोट्या स्वाभिमानाच्या गप्पा मारून जिल्हा बुडविण्याचे वास्तव लपवता येणार नाही. जनतेने त्यांना वारंवार नाकारले आहे. त्यामुळे आता पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पाटलांचा कार्यक्रम फार पूर्वीच झाला असून, आता तो विषय पुन्हा येणार नाही, अशा शब्दांत जयकुमार गोरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Exit mobile version