Jitendra Aavhad on : रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी एकनाथ शिंदेंप्रमाणेच बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजित पवारांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर आज अजित पवारांकडून पत्रकार परिषद घेत संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात झाली आहे. यानुसार काही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर काहींची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेते म्हणून झालेली नियुक्ती रद्द केली आहे. त्यावर आव्हाडांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. ( Jitendra Avhad Criticize to Ajit Pawar Press during NCP Political Crisis )
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
अजित पवारांच्या पत्रकार परिषद घेतली त्यावर आव्हाड म्हणाले की, आज काहींनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली त्यात काही पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या झाल्या. त्या पत्रकार परिषदेला कायदेशीर आणि संविधानिक मान्यताच नाही. कारण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यांनाच कायद्याने या सर्व नियुक्त्यांचे आणि पदावरून हकालपट्टी करण्याचे अधिकार असतात. तसेच हे त्या पत्रकार परिषद म्हणजे त्या किटी पार्टीतील सर्वांनी मान्य केले आहे. तर सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना पवारांनी रविवारीच पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. मग तुम्ही नेमणुका कशा करता तुम्हाला कायदेशीर अधिकारच नाहीत. असं यावेळी आव्हाडांनी सांगितलं.
आमचे हिंदुत्व हे मुस्लीमविरोधी नाही, तर ते…देवेंद्र फडणवीस म्हणाले
पुढे आव्हाड म्हणाले की, शिंदें-ठाकरेंच्या वादामध्ये न्यायमुर्ती चंद्रचुड यांच्या निकालाच्या दाखल्याप्रमाणे तुम्ही पक्षातून गट म्हणून बाहेर पडले मात्र तुमची संख्या कितीही असली तरी तुम्हाला पक्ष म्हणून मान्या देता येणार नाही. बाहेर पडून तुम्हाला दुसऱ्या पक्षात विलीन होणं हा एकच पर्याय आहे. तसेच तुम्हा 40 आमदाराच्या जीवावर पक्ष नाही ठरवू शकत. त्यामुळे पक्ष संघटनेला विचारात घेतल्याशिवाय तुम्हाला पक्ष म्हणून मान्यताच देता येत नाही. असं देखील यावेळी आव्हाड म्हणाले आहेत.
त्याचबरोबर अजित पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
पटेल म्हणाले, अजित पवारांकडून संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात झाली आहे. यानुसार आता जयंत पाटलांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटविण्यात आले असून सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत पाटील यांची तेव्हा तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केली होती. आता मी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष या नात्याने सुनिल तटकरे यांची नियुक्ती करत आहेत. आता जयंत पाटील यांनी त्यांच्या पदाची सुत्रे तटकरे यांच्याकडे सुपुर्द करावी. आता इथून पुढे पक्षाचे अध्यक्ष या नात्याने सुनिल तटकरे हे नियुक्त्या करतील. असं देखील सांगण्यात आलं आहे.