Download App

आपण मांसाहारी लोकं, अचानक ब्राम्हणवाद… कत्तलखाने बंदीवरून आव्हाड भडकले

Jitendra Awhad यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याच्या आदेशावरून राज्य सरकारवर भडकल्याचं पाहायला मिळत आहे.

Jitendra Awhad Criticize BJP Government for On Ban On Sale Of Meat : 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश राज्यातील काही महानगरपालिकेकडून देण्यात आल्याने राज्यात राजकारण तापले आहे. या निर्णयाचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोध करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड कत्तलखाना बंदीवरून भडकल्याचं पाहायला मिळत आहे.

कबूतरखान्याचा वाद चिघळला! मराठी एकीकरण समितीचं आंदोलन; पोलिसांनी केली धरपकड

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

कत्तलखाने बंदिचा  38 वर्षा पूर्वीचा आदेश हा कत्तलखाने बंद ठेवा असं आहे. विक्रीवर बंदी नव्हती. तसेच आता परिस्थिती बदललेली आहे. महाराष्ट्रातील 80 टक्के वर्ग हा मांसाहारी आहे. तसेच 15 ऑगस्टल शुक्रवार आहे. त्या दिवशी मध्यम वर्गीय माणसं मांसाहार करतात. आपण सर्व मास भक्षण करणारी लोक आहोत. अचानक ब्राम्हणवाद आणून मांसाहार बंद केला जात आहे. पण बहुजनांच्या घरात सणवार हे मांसाहार करून साजरे केले जातात. सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने देखील हे मान्य केलं आहे. ही बंदी म्हणजे केवळ द्वेष निर्माण केला जात आहे. अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

सत्ता गेल्याने सारासार विवेक गमावलेले आव्हाड-ठाकरे शरद पवारांचा निषेध करणार? कत्तलखाने बंदीवरून भाजपचा सवाल

15 ऑगस्टला मासांहार विक्री बंद ठेवणे अयोग्य – अजित पवार

या प्रकरणात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, मी टिव्हीवर बातमी पाहिली, श्रध्देचा विषय असतो त्यावेळी अशा प्रकारे बंदी घातली जाते. आषाढी एकादशी, महावीर जयंती अशावेळी असा निर्णय घेतला जातो. कोकणात आपण गेलो तर प्रत्येक भाजीत सुकट टाकतात. त्यामुळे अशी बंदी घालणे योग्य नाही. भावनिक मुद्दा असेत तर त्या काळासाठी बंदी घातली तर लोक समजू शकतात पण 15 ऑगस्ट रोजी अशी बंदी महाराष्ट्रात घालणे योग्य नाही. असं माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले. तसेच या प्रकरणात सविस्तर माहिती घेणार असेही माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले.

काँस्टिट्यूशन क्लब निवडणुकीत भाजपाचा दबदबा; खासदार राजीव प्रताप रूडी विजयी

नेमकं प्रकरण काय?

मालेगाव शहरातील सर्व खाजगी कत्तलखाने, म्हैस मांस विक्रेते, बकरा मटन व कोंबडी मटन विक्रेते यांनी आपली दुकाने 15, 20 आणि 27 ऑगस्ट या दिवशी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश मालेगाव महानगरपालिकेने दिले आहे तर संभाजीनगरमध्ये 15 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व कत्तखाने बंद ठेवण्याचे आदेश संभाजीनगर महापालिकेकडून देण्यात आले. महापालिकेच्या आदेशानुसार, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती 20 ऑगस्ट आणि जैन पर्युषण पर्व व 27 ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी, जैन संवत्सरी असल्याने मासविक्री दुकाने आणि कत्तखाने बंद ठेवण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहे.

follow us