नितीन करीर कर्तव्यनिष्ठ, पण सरकारच्या विरोधात चौकशी करणार का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

Jitendra Awhad on fair : खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेची एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त कृली आहे सदस्याचे नाव नितीन करीर जे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, अत्यंत हुशार आणि कायद्याच्या चौकटीबाहेर न जाणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पण, सरकारच्याच हाताने झालेली चूक आणि त्याची चौकशी ते कसे काय करु शकतील, याबद्दल मात्र शंका आहे. […]

Jitendra Awhad

Jitendra Awhad

Jitendra Awhad on fair : खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेची एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त कृली आहे सदस्याचे नाव नितीन करीर जे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, अत्यंत हुशार आणि कायद्याच्या चौकटीबाहेर न जाणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पण, सरकारच्याच हाताने झालेली चूक आणि त्याची चौकशी ते कसे काय करु शकतील, याबद्दल मात्र शंका आहे. यामध्ये सरकारकडून झालेल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या हे नितीन करीर हे करु शकतील का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.

आव्हाड म्हणतात नितीन करीर यांच्या एकंदर कारकिर्दीबद्दल महाराष्ट्रातील कुठल्याच राजकारणी व्यक्तीच्या मनात शंका नाही पण जर चौकशीच करायची असेल आणि महाराष्ट्राला सत्य कळूच द्यायचे असेल, तर उच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशामार्फत ह्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणे गरजेचे आहे. नितीन करीर यांच्यामार्फत चौकशी करण्यापेक्षा चौकशी न केलेलीच बरी. उगाच IAS अधिका-यांना का बदनाम करावे.

माझ्याशी खुलेआम चर्चा करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा चॅलेंज…

नितीन करीर ह्यांची कारकिर्द निष्कलंक आहे त्यांनी ही जबाबदारी ज्या मुळे बदनाम होण्याची शक्यता आहे ती नाकारावी कारण इतिहास ह्या गोष्टीसाठी आता कोणालाच माफ करणार नाही. महाराष्ट्राला सत्य कळलेच पाहिजे असे देखील आव्हाड म्हणाले

Exit mobile version