K Annamalai on Raj Thackeray over mumbai city Statement : मला धमकी देणारे आदित्य आणि राज ठाकरे कोण? असा थेट प्रश्न भाजपचे तामिळनाडूतील नेते के. अन्नामलाई यांनी उपस्थित करत ठाकरेंविरोधात शड्डू ठोकला आहे. तसेच माझे पाय छाटण्याची धमकी देणाऱ्यांना मी पुन्हा मुंबईत येणार आहे माझे पाय छाटण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करून पहा असे थेट आव्हान अन्नामलाई यांनी दिले आहे. ठाकरे बंधूंनी फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी मुंबईतील सभा बोलवली होती. मलाही माहिती नव्हते की मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्या लोकांनी कुणीतरी असं लिहिलं आहे की मी मुंबईत आलो तर माझे पाय छाटून टाकतील. अशा लोकांना मी सांगतो की, मी मुंबईत येणार आहे. माझे पाय छाटण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करून पाहा. धमक्यांना घाबरणारा असतो तर,मी माझ्या गावात लपून बसलो असतो असेही अन्नामलाई म्हणाले.
ही शेवटची निवडणूक! व्हिडिओ दाखवत भाजपची चिरफाड, राज ठाकरे गरजले
कोण ती तामिळनाडूची रसमलाई
Bombay is not Maharashtra City असा उल्लेख भाजपचे तामिळनाडू मधील नेते के अनामलाई यांनी केला होता. त्यांच्या या विधानाचा राज ठाकरेंनी मुंबईतील सभेत जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, काल परवा ती तामिळनाडूतून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध काय ? भ*व्या तुझा काय संबंध इथे यायचा असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला. याच्यासाठीच बाळासाहेब म्हणाले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी.
ठाकरेंना फायदा पण, राज इतिहासातील मोठ्या पराभवाचा धनी ठरतील; फडणवीसांची भविष्यवाणी
महाराष्ट्रातील लोकांचे योगदान कुठेही नाकारलेले नाही
राज ठाकरेंच्या हल्ल्यानंतर अन्नामलाई यांनी त्यांच्या विधानावर सष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मुंबई शहर हे केवळ महाराष्ट्रापुरते सिमीत नसून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याने महाराष्ट्रातील लोकांचे योगदान कुठेही नाकारलेले नाही, असेही अनामलाई म्हणाले. जर मी म्हणत असेन की कामराज हे भारताचे सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर याचा अर्थ असा होतो का की ते तमिळ राहिले नाहीत? त्याचप्रमाणे मी जर म्हणतोय की, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. तर त्याचा अर्थ असा होतो का की, महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केलेली नाही?
Chennai, Tamil Nadu | Responding to MNS Chief Raj Thackeray's remarks against him, BJP leader K Annamalai says, "Who are Aaditya Thackeray and Raj Thackeray to threaten me? I am proud to be a farmer’s son. They have organised meetings just to abuse me. I don’t know whether I have… pic.twitter.com/O6QFK9ebxw
— ANI (@ANI) January 12, 2026
अन्नामलाईंचं विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही – फडणवीस
अन्नामलाई यांच्या विधानावर टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस म्हणाले की, अन्नामलाई हे काही अखिल भारतीय नेते नाही. ते तामिळनाडूचे आमचे नेते आहेत. येथील तामिळ नागरिकांच्या आग्रहाखारत ते मुंबईत आले होते. नुकतचं त्यांनी हिंदी बोलायला सुरूवात केली आहे. मी जेव्हा तामिळनाडूला पहिल्यांदा सभा घ्यायला गेलो त्यावेळी माझ्या तोंडून चेन्नई ऐवजी मद्रास निघालं होतं. याचा अर्थ मला तेथे अपमान करायचा नव्हता. त्यामुळे त्यांचे विधान इतकी गांभीर्याने घेण्याची आवश्यक्यता नाही हे मुंबईच आहे असे फडवीसांनी सांगितले.
