Breaking! उद्धव ठाकरेंना दिल्लीचे निमंत्रण, राहुल गांधी, सोनिया गांधींना भेटणार

काँग्रेसचे महासचिव के.सी वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसकडून दिल्लीला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचे केे.सी.वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच कोल्हापुरकरांना 100 कोटींचं गिफ्ट, रस्ते होणार चकाचक या […]

Udhav Thackerye & Soniya Gandhi

Udhav Thackerye & Soniya Gandhi

काँग्रेसचे महासचिव के.सी वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसकडून दिल्लीला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचे केे.सी.वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच कोल्हापुरकरांना 100 कोटींचं गिफ्ट, रस्ते होणार चकाचक

या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित होते.

वेणुगोपाल म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या पाठिशी काँग्रेस खंबीरपणे उभी राहणार आहे. शिवसेनेविरोधात ईडी, सीबीआयचा वापर करण्यात आला आहे. तसाच वापर इतर पक्षांबरोबर सुरू आहे. देशात हुकुमशाहीचे राज्य सुरू असल्याचा आरोप वेणुगोपाल यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना दिल्लीचे निमंत्रण देण्यात आले आहे. ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याशी निवडणूक संदर्भात चर्चा करणार असल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात लवकरच ऑपरेशन कमळ, पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा

देशासमोर अनेक मोठे प्रश्न आहेत. सर्वपक्ष आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडणुकासमोर उभ्या राहिल्या आहेत. मध्यल्या काळात जे. पी. नड्डा यांनी सर्व पक्ष संपतील, भाजपच राहील, असे भाष्य केले आहे. त्यांनी शिवसेनेशी गद्दारी, घात केला आहे. आणखी काही पक्षात तसेच करायचे आहे. काही जण नरभक्षक असतात. आता भाजप सत्ताभक्षक झाल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version