Kalicharan Maharaj राजकारणी मुस्लिमांपुढे कुत्र्यांसारख्या… कालीचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

Kalicharan Maharaj हे त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यावेळी देखील त्यांनी अशाच प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं.

Kalicharan Maharaj

Kalicharan Maharaj

Kalicharan Maharaj Controversial Statement about Hindu Muslim Voters : कालीपुत्र कालीचरण महाराज हे नेहमीच त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त अशा हिंदूत्ववादी वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यावेळी देखील त्यांनी अशाच प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी मतदानाच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांना आणि हिंदू मुस्लिमांच्या मतदानावरून टीका केली आहे. मात्र यावर बोलताना त्यांची जीभ घसरली. त्यामध्ये त्यांनी राजकीय नेत्यांना कुत्रे तर हिंदूंना जातीयवादी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज?

राजनीतीची हवा जेव्हा लोकांचा डोक्यात जाते तेव्हा धर्म विसरतो. म्हणून राजनीती डोक्यातून काढून धर्मा, देशासाठी जो काम करेल त्याला सत्तेत बसवा. धर्म फक्त सनातन हिंदू धर्मच आहे ज्यातून ईश्वरचा साक्षात्कार होतो. तोच खरा धर्म आहे. धर्मज्ञानाची वृद्धी करून वोटर बँक बना. कट्टर हिंदू लोकांना सत्तेत पाठवा राजनीतीची हिंदूकरण करणे याशिवाय पर्याय नाही. आपण हिंदू 45 टक्के वोट करतो तर मुस्लिम समाज हा धर्मासाठी 100 % वोट करतात.

जंगली पिक्चर्स आणि राज कुमार गुप्ता यांची मोठी भागीदारी, आगामी टेंटपोल थिएटरिकल चित्रपटाची घोषणा

आपण सडका जातीवाद डाळ तांदूळ याच्यासाठी वोट करतो धर्मासाठी नाही. त्यामुळे हे सर्व डोक्यातून काढून धर्मासाठी एकजुटीने मतदान करा. व जो हिंदू धर्म साठी, हिंदू रक्षणासाठी काम करेल त्याला सत्तेत पाठवा. आपण सर्व एक हिंदू वॉटर बँक बनली तर सत्तेत बसल्यांनाही आपले काम करावे लागणार आणि हे सर्व आपल्या हातात आहे. यासाठी हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी केले.

आता मला थांबायचयं! देवेंद्रंच्या विश्वासू आमदाराचा राजकारणाला रामराम; भावनिक पत्र व्हायरल

नंदुरबार येथे हिंदू जनजागृती सभा यांचा वतीने हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर आयोजक डॉ नरेंद्र पाटील यांचा सह सर्व संत महात्मा उपस्थित होते. यावेळी कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी त्यांनी मतदानाच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांना आणि हिंदू मुस्लिमांच्या मतदानावरून टीका केली आहे. मात्र यावर बोलताना त्यांची जीभ घसरली. त्यामध्ये त्यांनी राजकीय नेत्यांना कुत्रे तर हिंदूंना जातीयवादी म्हटलं आहे.

Exit mobile version