Download App

Kalicharan Maharaj : आमदार-खासदारांनी पिन मारली म्हणून… ‘त्या’ गुन्ह्यावर कालीचरण महाराजांची प्रतिक्रिया…

Kalicharan Maharaj on Filed case due to Offensive Speech : नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांवर वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी चार महिन्यानंतर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कालीचरण महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी अहमदनगरच्या दिल्लीगेट परिसरात कालीचरण महाराजांनी सभेत आक्षेपार्ह भाषण केलं होतं. त्यानंतर तोफखाना पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यावर आता कालीचरण महाराजांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, ‘माझ्यावर इतक्या उशीरा गुन्हा दाखल झाला. कारण कुणीतरी हिंदू द्रोह्यांनी पोलिसांना पिन मारली असेल तो राजा असेल म्हणजे आमदार-खासदार असेल. त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला असेल की, गुन्हा नोंदवा. पण आम्ही हिंदू धर्मासाठी जेलमध्ये जाण्यास तयार आहोत.’ अशी प्रतिक्रिया गुन्ह्यावर कालीचरण महाराजांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayanat Patil यांना पुन्हा ईडीची नोटीस चौकशीला हजर राहण्याचे आदेश

14 डिसेंबर 2022 रोजी लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतरणविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे आयोजन सकल हिंदु समाजाच्यावतीने करण्यात आलं होतं. मोर्चाच्या समारोपावेळी आयोजित केलेल्या सभेत कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. या मोर्चासाठी गुजरातच्या काजलदीदी हिंदुस्थानीदेखील उपस्थित होत्या.

16 आमदारांच्या प्रकरणावरुन ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवणार?

कालीचरण महाराजांवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून तोफखाना पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी अजय गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून कालीचरण महाराज यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कालीचरण महाराज येत्या 12 मे रोजी नगर तालुक्यातील शेंडी गावात एका कार्यक्रमानिमित्त येणार आहेत.

Tags

follow us