Download App

Kapil Sibal : १२ आमदारांचा प्रश्न लांबवून ठेवणं हे राज्यपालांचं राजकारण…

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court )  घटनापीठासमोर आज शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा युक्तीवाद सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ( Kapil Sibal )  यांनी आज आपली बाजू मांडली. सुप्रीम कोर्टात आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. सुनावणी मध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. तर  शिंदे गटाकडून हरिश साळवे, नीरज किशन कौल, मनिंदर सिंग युक्तिवाद करणार आहेत.

आमदारांनी बंड करणं हे सभागृहाच्या बाहेर घडलेली घटना आहे. त्यामुळे ते विधानसभा अध्यक्ष नव्हे तर पक्ष अध्यक्ष पक्षशिस्त भंगाची कारवाई करू शकतात, असा युक्तिवाद सिब्बल यांनी न्यायालयात केला. तसेच  राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नाही. राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलवण्याचे आदेश कसे काय दिले? हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला.

तसेच गटनेता ठरवण्याचे अधिकार कुणाला आमदारांना की पक्षाला? सभागृहाबाहेर बसून काही आमदार पक्षाचा व्हीप बदलू शकतात का?, असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संविधानाचं रक्षण करणं हे राज्यपालांचं कर्तव्य आहे. मात्र, मागील काही वर्षात राज्यपाल देशाच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेत आहेत. राज्यपालांनी सकाळीच शपथविधी घेतला आणि संविधानिक जबाबदारीच उल्लंघन केलं आहे. राज्यपालांच्या अधिकारांमध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत का ? १२ आमदारांचा प्रश्न लांबवून ठेवणं हे राज्यपालांचं राजकारण आहे, असे सिब्बल म्हणाले. दरम्यान मुद्देसूद युक्तिवाद करा आणि आजच युक्तिवाद संपवा, असे सिब्बल यांना सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे.

Tags

follow us