… तर शिंदेंना ‘मुख्य नेता’ पद दिलं कुणी? कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात प्रश्न

Kapil Sibal On Eknath Shinde : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून या सुनावणी दरम्यान युक्तिवाद करताना ठाकरे

Kapil Sibal On Eknath Shinde

Kapil Sibal On Eknath Shinde

Kapil Sibal On Eknath Shinde : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून या सुनावणी दरम्यान युक्तिवाद करताना ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता पद कुणी दिलं असा प्रश्न विचारला आहे.

युक्तीवादादरम्यान कपिल सिब्बल (Kapil Sibal) म्हणाले की, शिवसेनेच्या 1999 च्या पक्षघटनेत मुख्य नेता असे कोणतेही पद अस्तित्वात नव्हते. मग एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोणत्या पक्षघटनेच्या आधारे स्वत:ला हे पद बहाल करुन घेतले? हे सर्व पक्षविरोधी कृत्यांनंतर घडले आहे असं यावेळी कपिल सिब्बल म्हणाले. तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना 2010 मध्ये लागू झाल्या आहेत. चिन्ह वाटपाच्या परिच्छेद 15 चे गृहीतक असे आहे की, तुम्ही पक्षाच्या विशिष्ट घटनेनुसार निवडून आलेला किंवा नियुक्त झालेला आहात आणि त्यानंतर त्या राजकीय पक्षात फूट पडली आहे.

पक्षघटनेच्या वैधतेचा परिच्छेद 15 शी काय संबंध? निवडणूक आयोग हे केवळ एक न्यायाधिकरण आहे. पक्षघटना लोकशाहीवादी आहे की, अलोकतांत्रिक हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. समजा, माझ्या पक्षाची घटना अलोकतांत्रिक होती असे मी मानलो. मग त्याचा परिणाम काय होईल? फार फार तर पक्षाची नोंदणी रद्द करणे हाच एकमेव परिणाम होऊ शकते. त्याशिवाय निवडणूक आयोगाकडे दुसरा कोणताही अधिकारी नाही असं देखील कपिल सिब्बल म्हणाले.

कृषि विभागात नवीन पदे भरणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 मोठे निर्णय

तर पुढे बोलताना कपिल सिब्बल म्हणाले की, दुसरा गट (एकनाथ शिंदे) हासुद्धा त्याच पक्षघटनेची निर्मिती आहे. मग धनुष्यबाण चिन्ह त्यांना कसे काय मिळू शकते? जर माझी घटना अलोकतांत्रिक मानली गेली तर मला नोंदणी रद्द करण्याची नोटीस मिळायला हवी होती. मग या गोष्टीचा फायदा दुसऱ्या गटाला कसा काय मिळाला असेही यावेळी कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.

Exit mobile version