Karuna Munde : ‘…म्हणून धनंजय मुंडेंच्या नावाचं मंगळसूत्र घालणं बंद केलं’

मुंबई : करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. करुणा यांनी एक व्हिडीओ शेअर करत धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. आपल्याला लोकं विचारतात की मी मंगळसूत्र का घालत नाही? पण मला नाही घालायचं अशा कपटी पतीच्या नावाचं मंगळसूत्र अशा शब्दांमध्ये जोरदार टीका केलीय. धनंजय मुंडे प्रत्येक […]

Untitled Design (92)

Untitled Design (92)

मुंबई : करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. करुणा यांनी एक व्हिडीओ शेअर करत धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. आपल्याला लोकं विचारतात की मी मंगळसूत्र का घालत नाही? पण मला नाही घालायचं अशा कपटी पतीच्या नावाचं मंगळसूत्र अशा शब्दांमध्ये जोरदार टीका केलीय. धनंजय मुंडे प्रत्येक पाच सहा महिण्यात हॉस्पीटलमध्ये का भरती होतात? असाही सवाल केलाय.
YouTube video player
करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे हे कोणाचेच होऊ शकत नाहीत. धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे तुकडे खाऊन त्यांनाच आपली औकात दाखवली. ते आपल्या बायकांपासून काय काय करुन घेतो हे लवकरच सर्वांना माहीत होईल असंही सांगितलं. मी जेव्हा तुरुंगातून बाहेर पडले, तेव्हा माझ्या पतीचा फोन आला त्यानंतर मी त्यांना आयलव्ह यु म्हणाले पण त्यानंतरी तो माझ्यामागं माणसं पाठवतो अशा, माणसाच्या नावाचं कुंकू लावणं आणि मंगळसूत्र घालणं बंद केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

करुणा म्हणाल्या की, आजपर्यंत मी माझं तोंड बंद ठेवलं आहे. पण मला माहीत झालंय की माझ्याविरोधात काय काय कांड करत आहे. माझे खोटे व्हिडिओ तयार करुन शेअर करतो. लवकरच सर्वांना माहीत होईल. त्या व्हिडीओमध्ये कोण महिला आहे हे देखील लवकरच समजेल. मी ह्युमन राईट्सकडं तक्रार केली आहे. लवकरच मी न्यायालयात या सर्व गोष्टींची पोलखोल करणार आहे.

आज धनंजय मुंडे माझ्याविरोधात एवढं तुच्छ कृत्य करत आहे. धनंजय यांच्या प्रेमापोटी मी सर्व काही सोडून आले. मला दोनदा जेलमध्ये टाकले. माझ्या बहिणीला जेलमध्ये टाकले. मला पैशांची ऑफर दिली, माझी छळवणूक केली. माझी गाडी घेऊन गेला आणि माझ्या मुलाला जीप कंपास गाडी दिली. तीचं अॅव्हरेज दोन ते तीन किलोमीटरंचं आहे. त्यांना वाटतं की मी ती गाडी चालवणं परवडणार नाही. आपली आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी यावेळी केली.

Exit mobile version