Kharghar accident On Sudhir Mungantiwar : बॉम्बस्फोटाच्या आरोपीच्या संदर्भातील जामीन घेणाऱ्या लोकांना आम्ही काढणार नाही अशी भूमिका घेणारे हे लोक आहेत. सचिन वाझे हा ओसामा बिन लादेन आहे का ? असं म्हणणारे हे लोक आहेत. तेच लोक आज आम्हाला हे तत्त्वज्ञान सांगत आहेत. या विरोधकांनी सत्तेसाठी आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचं खोटं पत्र असा आरोप सुधीर मुनगंटीवारांनी विरोधांवरती केला. ते आज सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते.
हे खूप दुर्दैवी आहे की या दुःखदायक घटनेचे हे लोक राजकारण करत आहेत. जेव्हा एन्काऊंटर झालं तेव्हा त्यांच्या विधवा पत्नीला दहा लाखांचा चेक तुम्ही पार्टी फंड मधून देता. या घटनेबाबत पार्टी फंड मधून मदत करावी असं वाटलं नाही का ? असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
म्हणजे किती शूद्र राजकारण करायचं, किती मायावी रूप घ्यायचं आणि म्हणूनच याची याचिका हाय कोर्टामध्ये टाकण्याचा एकाने प्रस्ताव दिला त्याच आम्ही स्वागत करतो. जेव्हा हा कार्यक्रम भव्य दिव्य झाला तेव्हाच काही लोकांना त्रास व्हायला लागला. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी फक्त सरकारचे अधिकारी नव्हते तर श्री सदस्यांचाही त्यामध्ये सहभाग होता.आता काही लोक म्हणतात की कार्यक्रम दुपारी का केला, मग त्यावेळेस तुम्ही का नाही सुचवलं. असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नीरा उजव्या कालव्याची सुटणार सलग दोन आवर्तनं
महाराष्ट्रात एक तरी नेता म्हटलेलं तुम्ही दाखवा, की दुपारी का कार्यक्रम घेताय संध्याकाळी घ्या. कारण तेव्हा असं काही होईल असं वाटलेलं नव्हतं. माननीय मुख्यमंत्र्यांची पत्नी या स्वतः उन्हात बसल्या होत्या. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव हे सुद्धा स्वतः उन्हात बसले होते. उगाच या घटनेचं विरोधकांकडून राजकारण केलं जात आहे.
खारघर दुर्घटनेची जबाबदारी सरकार झटकत नाही आहे. म्हणून सरकारने याचिकेचे स्वागत केलं. अतिरिक्त मुख्य सचिव यांची कमिटी नियुक्त करण्यात आली. 40 पानांची नियोजन पुस्तिका आहे. त्या नियोजन पुस्तिकेमध्ये ज्या व्यवस्था आहेत त्या वस्तुस्थितीमध्ये होत्या का याचाही तपास सुरू आहे. यासंदर्भामध्ये ज्यांचा जीव गेला त्यांच्या आसपासच्या लोकांचा जबाब घेतला जात आहे.माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन भेट दिली आहे.
तिथे कारण नसताना जाऊन प्रत्येकाने भेट देऊन व्यवस्थेमध्ये ताण निर्माण होईल असं वागू नये. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना लगावला.