Kolhapur Breaking : मुलाच्या वैद्यकिय शिक्षणासाठी बँकेने शैक्षणिक कर्ज दिलं नाही. अनेकदा बँकेकडे विनंती आणि अर्ज करूनही, त्याची दखल बँकेने घेतली नाही. बँकेनं कर्ज नाकारल्याने मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. या चिंतेतून तसेच नैराश्यातून कोल्हापूर जिल्ह्यात एका शेतकऱ्यांना आपलं जीवन संपवलं आहे.
महादेव पाटील असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील यांनी आपल्या मुलाल शैक्षणिक कर्ज मिळावे यासाठी बँकेकडं सातत्याने प्रयत्न केले. ते बँकेत गेल्यावर पुढच्या फेब्रुवारी महिन्यात या, असे सांगण्यात आले. त्यानंतर महादेव पाटील यांनी दागिने गहान ठेवून मुलाच्या शिक्षणाची तात्पुरती सोय केली होती. पुन्हा ते बँकेच्या सुचनेनुसार ते फेब्रुवारी महिन्यात बँकेत कर्जासाठी गेले होते. मात्त्यार, त्यावेळी बँकेने कर्ज देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
Hindenburg Case : शरद पवार उतरले अदानी यांच्या बचावासाठी! म्हणतात… जेपीसीची मागणी निरर्थक! – Letsupp
महादेव पाटील यांनी वारंवार कर्जासाठी बँकेच्या दारात खेटे मारले होते. बँकेने आज कर्ज देऊ, उद्या कर्ज देऊ असे सांगत टाळाटाळ केली. या शेतकऱ्याने आधीच शेतीचं देखील कर्ज घेतले होते. तसेच मुलाला डॉक्टर बनवण्याची चिंततून नैराश्य आल्याने महादेव पाटील यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.