Download App

कोल्हापूरचा इतिहास समाज परिवर्तनाचा; नगर, कोल्हापूरच्या दंगलीनंतर पवारांचं मोठं आवाहन

Sharad Pawar On Kolhapur Ride :  कोल्हापूर आणि नगरमध्ये औरंगजेबाचा फोटो आणि स्टेटसवरील मेसेजवरून काल (दि. 7) रोजी हिंसा उसळली होती. त्यानंतर येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दोन्ही शहरांमधील घटनांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाला सहकार्य करा, कायदा आणि सुव्यवस्था राखा, असेही आवाहन शरद पवार यांनी केले आहे. कोल्हापूर आणि नगरमधील घटना लौकीकाला शोभणाऱ्या नाहीत. कोल्हापूरचा इतिहास समाज परिवर्तनाचा इतिहास आहे. सर्व सामान्य लोकांनी शासकीय यंत्रणेला सहकार्य दिलं पाहिजे असे पवार यांनी म्हटले आहे.

पवार म्हणाले की, शाहू महाराजांचा आदर्श ठेवून सामान्यांच्या हिताची जपणूक केली पाहिजे. चार दोन लोक चुकीचं वागत असेल तर बहुतेकांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. सर्वांनी शांततेचं सहाकार्य करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. कोल्हापूर असो की इतर या सर्व शहरांची सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे तिथे शांतताच प्रस्थापित केली पाहिजे. वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.

Kolhapur : तणावपूर्ण शांतता, तगडा बंदोबस्त… : पेटलेल्या कोल्हापूरमध्ये काय आहे सद्यस्थिती?

कोल्हापूरला सामाजिक परिवर्तनाचा इतिहास

कोल्हापूर शहराला सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अशी पार्श्वभूमी असलेल्या शहरात तणाव निर्माण होणे चुकीचे आहे. कुणी चुकीचे वागत असेल तर बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घ्यावी. त्यामुळे वातावरण बदलेल असे पवार यांनी यावेळी सांगितले. राज्यात कुणी तरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्त करत असेल तर, त्यांनाही माझी विंनती आहे की, अशा घटनांमध्ये सर्वसामान्यांना किंमत मोजावी लागते. अशा घटना सर्वसामान्यांच्या हिताच्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची काळजी म्हणून तरी अशा घटनांना प्रोत्साहन देऊ नये.

Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…

कोल्हापुरातील सध्याची स्थिथी कशी?

दरम्यान, काल कोल्हापुरात उसळलेल्या परिस्थितीनंतर आता येथील स्थिती आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तणाव निवळत असून अनेक भागांतील दुकाने सुरु झाली आहेत. शहरात 2 दिवसात झालेल्या राड्याप्रकरणी 3 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात सुमारे 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 36 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

Tags

follow us