Download App

Video : राष्ट्रवादीच्या टीझरने विरोधकांची धाकधूक; ‘आपलं नाणं खणखणीत, भल्याभल्यांचा आवाज बंद करणार’

राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर शरद पवारांचा झंझावात दौरा सुरु झाला आहे. बीडच्या स्वाभिमान सभेनंतर आता राष्ट्रवादीची दुसरी स्वाभिमान सभा
उद्या ऐतिहासिक कोल्हापुरात पार पडणार आहे. या सभेआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. उद्याच्या सभेच्या टीझर प्रदर्शित झाल्याने विरोधकांची धाकधूकच चांगलीच वाढली असल्याचं दिसून येत आहे. सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या टीझरची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून हा टिझर अपलोड करण्यात आला आहे. यावर ‘आपलं नाणं खणखणीत आहे आणि हे नाणं भल्याभल्यांचा आवाज बंद करणार, कारण कोल्हापूरच्या आखाड्यात शड्डू पवार साहेबच ठोकणार! असा मजकूर लिहिण्यात आला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्ततेचं वातावरण आहे.

Seema Deo passed away : सुखी संसाराचं रहस्य सांगत सीमा यांनी सिनेसृष्टीतील दाम्पत्यांना दिला होता कानमंत्र

राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर पक्षाच्या उभारणीसाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. शरद पवार राष्ट्रवादीच्या पुर्नबांधणीसाठी राज्यभर करीत आहेत. छत्रपती संभाजीनगरनंतर राष्ट्रवादीची पहिलीच स्वाभिमान सभा बीडमध्ये पार पडली. या सभेतून शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षासह अजित पवार गटावर टीकेची तोफ डागली होती.

Horoscope Today 24 August 2023: ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

बीडच्या स्वाभिमान सभेनंतर आता शरद पवार यांची तोफ उद्या कोल्हापुरात धडकणार आहे. 25 आणि 26 ऑगस्ट रोजी शरद पवार हे कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. शरद पवारांच्या आधीच आमदार रोहित पवार कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. रोहित पवारांनी कोल्हापुर दौऱ्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर मुश्रीफ यांनीही पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आता उद्याच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांवर काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=VNP7UuTnFvk

दरम्यान, शऱद पवार उद्याच्या सभेकडे सर्वांचंच विशेष लक्ष असणार आहे. कारण या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती असणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, श्रीनिवास पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.

Tags

follow us