Download App

अमित ठाकरेंचं वक्तव्य बालिश, इर्शाळवाडीचं राजकारण नको; गिरीश महाजनांची टीका

Girish Mahajan : इर्शाळवाडीतील घटनेवर अमित ठाकरेंनी केलेलं वक्तव्य बालिश आहे. हा निसर्गाचा कोप आहे. अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कृपा करून त्यावरून तरी राजकारण करू नका. धोक्याच्या यादीत इर्शाळवाडी हे नव्हतं, अचानक हे संकट कोसळलं आहे.एवढं मोठा संकट येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं असं या ठिकाणच्या रहिवाशांनी सुद्धा सांगितला आहे. अतिवृष्टी पाऊस, वादळ यामुळे हा डोंगर कोसळला. धोकादायक डोंगर आणि त्याखाली वस्ती अशा धोक्यांच्या यादीमध्ये ही वाडी नव्हती मात्र दुर्दैवाने या ठिकाणी ही मोठी घटना घडली.अशी प्रतिक्रिया ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या जी-2 युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते. (Girish Mahajan Criticize Amit Thackrey on Raigad Irshalwadi Landslide)

चंद्रकांत पाटलांचे निवृत्तीविषयी मोठे विधान; म्हणाले, मी त्यानंतर…

तसेच यावेळी इर्शाळवाडीतील घटनेची माहिती देताना महाजन म्हणाले की, – इर्शाळवाडी येथील दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढू शकतो. घरंच्या घरं याठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले आहेत. तर दुसरीकडे याठिकाणी सततचा पाऊस, आणि अतिवृष्टी यामुळे कुठलीच मशिनरी याठिकाणी पोहचत नाही. त्यामुळे हाताने याठिकाणी माती बाजूला करावा लागत आहे.

इर्शाळवाडीतील गावकऱ्यांच्या मदतीला Jui Gadkari आली धावून; पोस्ट शेअर करत म्हणाली…

त्यामुळे या ठिकाणी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू असल्याने मदत कार्यात येत असलेल्या अडचणी येत आहे. माती काढण्यात वेळ जात आहे. गेल्या वेळी रायगड आणि माळीन येथील घटनेप्रमाणे ही घटना आहे. त्या ठिकाणी पंचनामे करावे लागले होते. त्याच प्रमाणे आता इर्शाळवाडी येथे देखील परिस्थिती निर्माण होईल व त्यामुळे मृतांचा आकडा हा वाढु शकतो. आतापर्यंत 22 ते 24 जनाचे मृतदेह याठिकाणी सापडले आहेत, मात्र एक दोन दिवसात मृतांचा नेमका आकडा समोर येईल.

काय म्हणाले होते अमित ठाकरे?

आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर ही दुर्घटना टाळता आली असती. इर्शाळवाडी गावातील दुर्घटनेतून 75 जणांना बाहेर काढलं असलं तरी देखील त्यांच्याकडे आता काय उरलं आहे?राज ठाकरेंनी यापूर्वीच सांगितलं होतं की, अशी घटना घडू शकते, त्यांना याचा काय अंदाज आला होता माहित नाही, पण त्यांनी आधीच सावध केलं होतं. मात्र हे सर्वजण आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर त्यांच्याकडून वेळीच लक्ष घातलं गेलं असतं. मात्र सरकारकडून याकडे दुर्लक्ष केलं जातं हे दुर्देवी आहे. अशी टीका इर्शाळवाडीच्या घटनेवरून सरकारवर टीका केली होती.

Tags

follow us