Modi Express Dadar Sawantwadi: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेली ‘मोदी एक्स्प्रेस’ आज दुपारी 12 वाजता दादर स्थानकातून सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. मंत्री नितेश राणे यांनी दादर स्थानकावर या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
मुंबई–कोकण प्रवाशांना दिलासा; सीएसएमटी–सावंतवाडी रोड नियमित रेल्वेसेवेचा शुभारंभ
यावेळी प्रवाशांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. बाप्पाच्या जयघोषात ‘मोदी एक्स्प्रेस’ कोकणाकडे रवाना झाली. गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे आरक्षण मिळणे कठीण होते. तसेच खासगी वाहनांच्या तिकिटांचे वाढलेले दर यामुळे चाकरमान्यांसमोर मोठी अडचण निर्माण होते. अशा परिस्थितीत ‘मोदी एक्स्प्रेस’मुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा चाकरमान्यांना फायदा होणार आहे.
छगन भुजबळ कशाला काडी लावतो म्हातारपणात; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा घणाघाती वार
गेली 14 वर्षे अविरतपणे मंत्री नितेश राणे यांनी स्वखर्चाने गणेशभक्तांना ही प्रवासाची मोफत सुविधा दिली आहे. दुसरी मोदी एक्सप्रेस ट्रेन रविवार 13 सप्टेंबर रोजी रवाना होणार आहे. दरवर्षी राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त करत मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
नितेश राणेंनी व्यक्त केल्या भावना
कोकणवासीय गणेशभक्तांना गणेशोत्सव आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने व उत्साहात साजरा करता यावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून चाकरमान्यांच्या कोकण प्रवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
आज दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 येथून पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ गणेशभक्तांना घेऊन कोकणाच्या दिशेने रवाना झाली. यावेळी झेंडा दाखवून या विशेष रेल्वेला मार्गस्थ करण्यात आले.
सोनम वांगचूक यांना जसं उचलून नेलं, तसं जरांगेंसोबत सरकारने चुकूनही करु नये; अभिजीत दिपकेंचा इशारा
यंदा या उपक्रमाचे हे 14 वे वर्ष असून, गणपती बाप्पाच्या आगमनाची आस मनात घेऊन कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी होणार आहे.
गणपती बाप्पा मोरया…
अशा भावना नितेश राणेंनी त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवरुन व्यक्त केल्या.
